गणेश सुळ
Daund News : केडगाव : यंदा राज्यात पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे खेडोपाडी पाणीटंचाईची झळ भासली. बळीराजाने उत्पन्नाचा पर्याय म्हणून कमी कालावधीत येणारे कोथिंबीर पीक घेण्याचे ठरवले. मात्र, आवक वाढल्याने सध्या कोथिंबीर कवडीमोल भावाने विकली जात आहे. शेतमालाचे दर दिवसेंदिवस कोसळत असल्याने शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे.
बळीराजा हतबल
गेल्या काही दिवसांपासून बळीराजा हतबल झाला आहे. उशीरा आलेल्या पावसाने मोठे नुकसान केलेले असताना शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. (Daund News) काही दिवसांपूर्वी कोथिंबीरीला भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओरडून नागरिकांना मोफत कोथिंबीर वाटल्याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
एकीकडे टोमॅटोचे भाव वाढल्याने शहरी मध्यम वर्ग ते उच्च वर्गामधून संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. ग्राहकांना स्वस्तात टोमॅटो मिळावेत यासाठी सरकारने नाफेडद्वारे इतर राज्यातून टोमॅटो आयात करण्याचे ठरवण्यात येत आहे. (Daund News) आता कोथिंबीर अगदी कवडीमोल भावाने विकली जात आहे, त्यावर मात्र सगळेच मूग गिळून बसले आहेत. हा कोणता न्याय आहे, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
मांजरी (शेवाळवाडी) मार्केट यार्डमध्ये आज कोथिंबीर ४ रुपये जुडी असा बाजार झाला. ग्राहक ४ रुपये जुडीच्या भावात देखील कोथिंबीर घेत नसल्याने आता फुकट विकतो, फुकट तरी घ्या… असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. अनेकांनी चांगल्या भाज्या सडून जाण्यापेक्षा एखाद्या गरीबाची भूक भागेल यासाठी भाजीपाल्याची मोफत विक्री केली. (Daund News) याचे फोटो आता व्हायरल होताना दिसत आहेत.
भाजीपाल्याल बाजारभावच मिळत नसेल, तर जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचे पोट कसे भरणार, हेच विदारक वास्तव आहे. शेतात कष्ट करून शेतमाल उगवण, आलेला माल काढणे आणि तो मार्केटपर्यंत घेऊन जाणे याचा खर्च देखील निघत नसल्याने वास्तव या व्हायरल छायाचित्रातून दिसत आहे. (Daund News) व्यापारी पुन्हा कमावतील पण शेतकऱ्याला किमान त्याच्या मेहनतीचं फळ देखील मिळावं अशी किमान अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी उद्विग्न होऊन प्रतिक्रिया देत आहे. आगामी काळात अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी टोकाचे पाऊल सुद्धा उचलू शकतो, अशी स्थिती आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : राजेगाव जिल्हा परिषद शाळेला महापारेषणकडून स्मार्ट टीव्ही भेट
Daund News : जुलै महिना संपत आला तरी पाऊस काय पडेना ! पावसाअभावी शेतकरी चिंताग्रस्त