राहुलकुमार अवचट
Daund News : यवत : दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन येथे गोरक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ गोरक्षकांनी यवत पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा काढून पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन यवत पोलिसांना विश्व हिंदू परिषदेच्यावतीने देण्यात आले. या वेळी भुलेश्वर फाटा ते यवत पोलीस स्टेशन असा निषेध मोर्चा काढण्यात आला.
पोलीस प्रशासनाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी
यवत पोलीस स्टेशन येथे गोरक्षकांवर १३ ऑक्टोबर रोजी खोटे गुन्हे दाखल करून गोरक्षांना, गो मातेला व समस्त हिंदू धर्माच्या लोकांना बदनाम करण्याचे काम या पोलीस खात्याने केले. यवत पोलीस स्टेशनचे हेमंत शेडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव हे तालुक्यातील कसायांशी हात मिळवून गोरक्षकांना हीन व अपनास्पद वागणूक देऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतात, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. (Daund News) असे म्हणत विश्व हिंदू परिषद, गोरक्षक दल, समस्त सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवरी (ता. १८) यवत पोलीस स्टेशनसमोर निषेध व्यक्त करण्यात आला.
यवत पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हे व हवालदार शिंदे यांनी गोराक्षकांना २ पायांवरती बसवले. हवालदार शिंदे यांनी गोरक्षकांना मारले, याचा विविध घोषणा देत निषेध करण्यात आला. पुणे जिल्ह्यातून सर्वात जास्त बीप मटण व गो तस्करी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतून होते. तरी पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. (Daund News) या हद्दीतील कसायांवर ८-९ गुन्हे दाखल असून, पोलीस यांच्यावर कारवाई का करत नाहीत, यवत पोलीस स्टेशनच्या समोरून राष्ट्रीय महामार्गावरून बीप मटण घेऊन गाड्या वाहतूक करतात, तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही, अशांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करा, अन्यथा भविष्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. गोरक्षकांवरील खोटे गुन्हे तत्काळ माघारी घ्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या वेळी गोरक्षकांनी पोलीस प्रशासनाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. या वेळी अखिल भारत कृषी गो सेवा संघाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे, सरसेनापती हंबीरराव मोहिते, गोशाळा संस्थापक पंडीत मोडक व विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष गणेश आखाडे यांनी मनोगत व निषेध व्यक्त केला. (Daund News) या वेळी ऋषिकेश कामठे, अहिरेश्वर जगताप, गणेश हुलावळे, उपेंद्र बलकवडे, राजेंद्र लाड यांसह पुणे जिल्ह्यातील गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय कोणतीही चर्चा केली जाणार नाही, अशी भूमिका काही काळ गोरक्षकांनी घेतली व पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला. गोरक्षक पैसे घेतात असा आरोप करत असल्याने यावेळी गोरक्षकांनी चिल्लर गोळा केली. (Daund News) जवळपास २ तास आंदोलन केल्यानंतर गोरक्षक व पोलीस प्रशासन यांच्यामध्ये चर्चा झाली. या वेळी पत्रकारांना चर्चेसाठी जाण्यास पोलीस प्रशासनाच्या वतीने मज्जाव करण्यात आला.
या वेळी गोमांस किंवा गाई-म्हैशी कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याबाबत गोरक्षकांनी तत्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क करावा, (Daund News) पोलीस अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक गोरक्षकांना दिले असून, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी गोरक्षकांनी सहकार्य करावे, गोरक्षकांवरील दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल, यांसह विविध विषयांवर गोरक्षक व पोलीस प्रशासन यामध्ये चर्चा झाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड नगरपरिषदेच्या प्रकल्प अभियंत्यास दहा हजारांची लाच घेताना अटक
Daund News : दौंडमधील भूमिगत उच्चदाब वाहिनीचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते भूमिपूजन
Daund News : शेतातील पिवळं सोनं जगविण्याचे फूल उत्पादक शेतकऱ्यांसमोर आव्हान