संदीप टूले
Daund News : दौंड : दौंड तालुक्यातील पारगाव येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या सहा जणांना चोर समजून काही तरुणांनी मारहाण केली. यामध्ये तीन पुरुष, दोन महिला व एक अल्पवयीन मुलीचा समावेश आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रात्री एकच्या सुमारास पारगावमधील युवकांनी एकूण सहा जणांना चोर समजून पकडले. यामध्ये तीन पुरुष, दोन महिला व एक अल्पवयीन मुलीचा समावेश होता. या जमावाने अचानक प्रश्नांचा भडीमार सुरू केल्यामुळे हे कुटुंब गोंधळून गेले.(Daund News) वेळ रात्रीची असल्यामुळे ते घाबरले. तेव्हा तरुणांनी या कुटुंबाची झडती घेतली असता त्याना एक छऱ्याचे पिस्तूल आढळले. त्यामुळे या तरुणांचा संशय बळावला. हाच गैरसमज करून या तरुणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच गावामध्ये चोर आले, चोर पकडले ही बातमी सोशल मीडियाद्वारे पोस्ट केली. त्यामुळे अजूनच गोंधळ उडाला व मोठा जमाव जमा झाला.
त्यानंतर ही माहिती पोलिसांपर्यंत गेली व त्यानंतर खरी माहिती उजेडात आली. हे कुटुंब जामखेड येथील जवळा या गावी यात्रेसाठी गेले होते. (Daund News) तेथील यात्रा उरकून आढाव सहकुटुंब पुण्याच्या दिशेने निघाले होते. अचानक या तरुणांनी अडवल्यामुळे त्यांना काही सूचेना व त्यांच्याकडे मिळालेली पिस्तूलही लहान मुलांच्या खेळण्यातील असल्याचे आढळून आले.
प्रश्नांच्या भडीमाराने गोंधळ
पारगाव येथे त्यांना काही तरुणांनी अडवून प्रश्न विचारायला सुरुवात केली. (Daund News) त्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला आणि त्यांना काही प्रश्नांची उत्तरे देता आले नाहीत. या गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांना समजले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड तालुक्याच्या विकासासाठी कुल कुटुंबिय नेहमीच तत्पर – समाधान महाराज शर्मा