गणेश सूळ
Daund News : केडगाव : खुटबाव (ता. दौंड) येथील भैरवनाथ विद्यालयात २० वर्षांपूर्वी दहावीत शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. २० वर्षांनंतर पुन्हा एकत्रित जमलेले वर्गमित्र प्रथमच एकत्रितपणे भेटल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसत होता. “तेच मित्रमैत्रिणी, तीच वर्गाची खोली, तेच बेंच, तीच सकाळची प्रार्थना, तेच दुपारचे झाडाखालचे जेवण, तीच दोस्ती दुनियादारीचे” याचे दर्शन पुन्हा २० वर्षांनी अनुभूवायला मिळाले. (After almost 20 years, the school was again filled with former students of class 10 of Bhairavanath Vidyalaya in Khutbav)
खुटबाव (ता. दौंड) येथील भैरवनाथ विद्यालयात सन २००३ मध्ये दहावीत शिक्षण घेतलेले विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र जमले होते. (Daund News ) या वेळी प्रत्येकाने मनोगत व्यक्त केले. आपले शालेय जीवनातील अनुभव कथन केले. २० वर्षांनंतर पुन्हा एकत्रित जमलेले वर्गमित्र भेटल्याने विद्यार्थी भारावून गेले होते.
अत्यंत कमी दिवसांमध्ये नियोजन समितीने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करून देखील आपापल्या कामामध्ये व्यस्त असणारे ८० हुन अधिक माजी विद्यार्थी आपल्या शाळेतील जुन्या मित्र मंडळींना भेटायला आणि शाळा व शिक्षकांप्रती आदर व्यक्त करायला या स्नेह मेळाव्यात सहभागी झाले होते. (Daund News ) यावेळी प्रत्येकाने मनोगत व्यक्त केले. आपले शालेय जीवनातील अनुभव कथन केले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले
सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्वत्र विखुरलेले विद्यार्थी एकत्र आले होते. शालेय जीवनातील काही गमतीदार आणि काही विनोदी आठवणींना उजाळा दिला. (Daund News ) शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
आपल्यातील काही मित्र अंकुश कोल्पे, रमेश शेलार, अक्षय ठोंबरे, हौशिराम माने व सोमनाथ फडतरे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई फडतरे यांचे निधन झाले होते. (Daund News ) यावेळी त्यांना सार्वजनिक श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्वांनी आपले आपले परिचय देऊन २० वर्षातील सुख दुःखाचे अनुभव सांगून मने हलके केले. त्यानंतर शेवटी पसायदानाने या मेळाव्याची सांगता झाली..
दरम्यान, भैरवनाथ शिक्षण संस्थेचे खजिनदार तथा प्राचार्य अरुण थोरात यांचा दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. (Daund News ) यावेळी सचिन शेलार, विकास भिसे, श्रीकांत कदम,नितीन शितोळे, नाना डोंबाले, शहाजी टुले, शुभांगी थोरात,रेखा टुले, सारिका शेलार, अरुणा थोरात , सारिका थोरात,राहुल बोरकर,संग्राम टुले, शिक्षक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करणार; माजी आमदार रमेश थोरात
Daund News : देलवडी येथील जय मल्हार विद्यालयाचा ९२.१० टक्के निकाल; निकालात मुलींनी मारली बाजी
Daund News : रावेर तालुका कृषी अधिकारीपदी काळेवाडीचे सुपुत्र भाऊसाहेब वाळके यांची निवड….