राहुलकुमार अवचट
Alumni Meet In Excitement : यवत, (पुणे) : माणूस कितीही मोठ्या पदावर पोहोचला तरी बालपण, सवंगडी, शालेय जीवनातील मित्र-मैत्रिणींच्या सहवासात घालवलेले दिवस आणि गमतीजमती कधीच विसरू शकत नाही. अशाच बालपणीच्या, शाळेतल्या दिवसांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी नाथाचीवाडी (ता. दौंड) येथील माटोबा विद्यालयातील २००२ दहावीच्या मधील १० वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा ‘स्नेहमेळावा’ मेहेर रिट्रीट खुटबाव याठिकाणी पार पडला. (After 25 years in Nathachiwadi school in Daund taluka, alumni meet in excitement)
‘लहानपण देगा देवा’, असे म्हणत शालेय जीवनाला दिला उजाळा..
२१ वर्षांपूर्वीच्या आठवणींमध्ये सगळे रमून गेले होते. शाळेप्रमाणे राष्ट्रगीताने वर्गाची सुरवात करून प्रार्थना व परिपाठ घेण्यात आला, त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात आली.( Alumni Meet In Excitement) शालेय गणवेशात त्या काळी एकमेकांना भेटलेले वर्गमित्र आज पस्तीशी पार करताना, मात्र वेगळ्या पेहराव्यात एकमेकांसमोर आले.
याच आठवणींच्या हिदोंळ्यावर झुलताना प्रत्येकाचे मन दाटून आले होते. वर्गातील प्रत्येकाला कठीण प्रसंगी मदत करण्याचा संकल्प यावेळी घेत ‘लहानपण देगा देवा’, असे म्हणत साऱ्यांनीच धम्माल केली. (Alumni Meet In Excitement) २१ वर्षांनी विद्यार्थी भेटत असल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. उपस्थित शिक्षकांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
विष्णूदास दरेकर म्हणाले की, खरे तर आमच्यासाठी हा सुखद धक्का आहे विशेष म्हणजे आमच्या बरोबर उपस्थितामध्ये आमचे काही माजी विद्यार्थी मोठ्या पदावर गेले आहेत. अनेक दिवसांनी एकत्र आल्याचा आनंद आहे. (Alumni Meet In Excitement) सर्वांसाठी हा क्षण आनंदाचा अविस्मरणीय क्षण आहे. यापुढे दरवर्षी माजी विद्यार्थी मेळावा व्ह्यावा असे वाटते.
शाळेच्या माजी विद्यार्थी वृषाली खंडाळे हिने चंद्रा गाण्यावरील लावणी सादर करत शाळेत १५ ऑगस्ट,२६ जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे भाग घेत असणाऱ्या विद्यार्थिनीचे विष्णुदास दरेकर यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. (Alumni Meet In Excitement) यावेळी गुरूंकडून सत्कार सत्कार होणं म्हणजे माझ्या आयुष्यातील खूप मोलाचा क्षण असल्याचे वृषाली खंडाळे यांनी सांगितले.
शाळेचे दिवंगत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सर्वांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. (Alumni Meet In Excitement) सर्व जमलेल्या विद्यार्थ्यांनी मिळून उपस्थित शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली…
यावेळी शाळेचे शिक्षक मेमाणे सर हाके सर ,शिंपणकर सर, काकडे मॅडम यांसह स्नेहा इनामके, मोनाली पवार,पुनम नातू, पल्लवी होले, गणेश हाके, भाऊ गायकवाड, संदीप आवाळे, श्रीकांत थोरात, स्वाती रासकर,स्वाती मोरे, धनंजय शितोळे, मुकुंद रायकर, महेश दोरगे, राणी रासकर, प्रशांत ढवळे, अविनाश म्हेत्रे, शोभा वळकुंडे, काळूराम बर्वे आदि विदयार्थी उपस्थित होते. ( Alumni Meet In Excitement)
कार्यक्रमाचे नियोजन विजय दोरगे, अंकुश हाके, निर्मला लडकत – लोंढे, अर्चना शितोळे – कोंडे, नितीन धायगुडे यांनी केले होते. (Alumni Meet In Excitement) सूत्रसंचालन संदीप गडदे यांनी केले तर कविता शिंदे, अंकुश हाके यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांचे आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे बिबट्याचा हल्ल्यात शेळी ठार ; परिसरात भीतीचे वातावरण..
Daund Crime : दौंडमधील गोहत्या करणाऱ्या टोळीवर तडीपारीची कारवाई…