गणेश सुळ
Daund News : केडगाव : राजकीय गट-तट विसरून गावच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या देलवडी गावाला विविध विकासकामांसाठी 8 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. यामध्ये जल जीवन मिशन 6 कोटी, भक्ती निवास 19 लाख, अंगणवाडी बांधकाम, रंगरंगोटी 17 लाख, स्मशानभूमी सुशोभीकरण 15 लाख, ग्रामपंचायत सभागृह बांधकाम, सुशोभीकरण, गावातील रस्ते काँक्रीटीकरण, अंडर ग्राउंड गटार लाईन, प्राथमिक शाळा दुरुस्ती, मंदिर परिसर सुशोभीकरण अशी विविध विकासकामे सुरू आहेत. तर उर्वरित कामांसाठीही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. (8 crores sanctioned for development works to Delawadi village; Commencement of Anganwadi construction and other works)
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले कौतुक
या देलवडी गावच्या अंगणवाडीची कामे डिजिटल स्वरूपात झालेली आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, सौर ऊर्जा तसेच बोलक्या भिंती सर्व काही आधुनिक डिजिटल पद्धतीने अंगणवाड्या तयार केल्या आहेत.(Daund News) याचे कौतुक पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. या देलवडी ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्यसेवा व अंगणवाडी सेवा शेत्रात नावीन्यपूर्ण असे काम करणाऱ्या मेघना शेलार व शोभा नेमाने या दोन महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आल्याची माहिती सरपंच निलम काटे यांनी दिली. तसेच देलवडी गाव जिल्ह्यात आदर्शवत करण्यासाठी आम्ही कायमस्वरुपी प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विकास शेलार, शिवाजी आप्पा वाघोले, राजाभाऊ काटे, उल्हास वाघोले, अर्जुन वाघोले, शेख गुरुजी, अनिल वांझरे, बाप्पू शेलार, महादेव शेलार, रेखा टुले, संतोष लव्हटे, अविधा अडगळे, ग्रामसेवक व्ही. एन. झाडगे, आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा
Daund News : प्रती जेजुरी देलवडी येथील खंडोबा मंदिरामध्ये हापूस आंब्याची आकर्षक सजावट
Daund News : अनिकेत थोरात यांचे एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश