संदीप टूले
Daund News : दौंड : भीमथडी साहित्य भवनास पाच एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल. असे आश्वासन श्री बोरमलनाथ ट्रस्टचे अध्यक्ष कैलास शेलार यांनी दिली आहे. तसेच यामुळे नक्कीच दौंडच्या वैभवात भर पडेल. असेही शेलार यांनी सांगितले आहे. (5 acres of land will be made available for Bhimathadi Sahitya Bhavan at Kedgaon Chauphula: Shri Bormalnath Trust President Kailas Shelar)
भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे केडगाव चौफुला येथे उद्घाटन
अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य परिषद आयोजित दुसरे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन केडगाव चौफुला (ता. दौंड) बोरमलनाथ मंदिर येथे (दि २७ व २८) जून रोजी उत्साहात संपन्न झाले. या संमेलनाचे उद्घाटन दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. (Daund News) यावेळी बोलताना कैलास शेलार यांनी वरील आश्वासन दिले आहे.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर, ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष दिपक पवार, स्वागताध्यक्ष भाऊसाहेब फडके, निमंत्रक वसंत साळुंखे, न्यायाधिश वसंतराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव कोलते आदी मान्यवर उपस्थित होते. (Daund News)
यावेळी बोलताना डॉ.जयप्रकाश घुमटकर म्हणाले की, ग्रामीण भागात संमेलन होत आहे. ही अभिमानाची बाब आहे. राज्याच्या कानाकोपऱ्या पर्यंत साहित्याचे सूर घुमू लागले आहे. राज्यसरकारने संमेलनाची दखल घेऊन संमेलनास मदत करणे गरजेचे आहे.(Daund News) साहित्याचा मूळ गाभा ग्रामीण भागात शेण मातीत आहे. तो शोधण्याची गरज आहे असे सुतोवाच यावेळी घुमटकर यांनी केले.
यावेळी बोलताना दशरथ यादव म्हणाले की, सध्याच्या काळात साहित्याचे जतन होणे गरजेचे आहे. श्री बोरमलनाथ मंदिर चौफुला हे ठिकाण मध्यभागी असल्याने निसर्गरम्य वातावरणात स्थापित आहे. या ठिकाणी कलावंत, नाटककार, कवी, पत्रकार, साहित्यिक आदींना राहण्याची सोय उपलब्ध व्हावी व त्यांनी लिहिलेल्या साहित्याचे या ठिकाणी जतन करून त्याची महती सर्वजणांना या ठिकाणावरून उपलब्ध होऊ शकते. (Daund News) यासाठी जागा उपलब्ध झाल्यास हे स्वप्न सत्यात उतरू शकते अशी मागणी यावेळी संमेलन प्रवर्त यादव यांनी केली.त्यानंतर श्री बोरमलनाथ ट्रस्टचे अध्यक्ष कैलास शेलार यांनी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिली आहे.
दरम्यान, या संमेलनाच्या सुरवातीला श्री बोरमलनाथ महाराजांना भीमेच्या पाण्याने जलाभिषेक करून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती.(Daund News) त्यानंतर उद्घाटन, पुरस्कार वितरण समारंभ, प्रकट मुलाखत, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, समारोप अशा विविध उपक्रमांनी संमेलन उत्साहात पार पडले.
यावेळी भाजपाचे माऊली शेळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष सागर फडके, दौंडचे माजी सभापती नितीन दोरगे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय डाडर, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पासलकर, महाराष्ट्र राज्य कुणबी सेनेचे अध्यक्ष आपासाहेब कड, कॉंग्रेस आय ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष रोहित बनकर, ओबीसी सेवा संघाचे कार्याध्यक्ष तेजस टेंगले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Daund News)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : कापडी पिशव्या वापरा, पर्यावरण वाचवा : भैरवनाथ शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमढेरे
Daund News : “अमृत भारत” योजनेत दौंड रेल्वे स्थानकाचा समावेश; जंक्शनचा होणार विकास