गणेश सुळ
Daund News : केडगाव : देलवडी ते इनामके वस्ती हा जवळपास चार किलोमीटरचा रस्ता तीन टप्यात का होईना पूर्ण झाला. परंतु, यातील फक्त 100 ते 200 फुटाचे अंतर हे जीवघेणे बनले असून, याकडे प्रशासन एक वर्षाहून अधिक काळ दुर्लक्ष करत आहे.
देलवडी, नाथचीवडी, खुटबाव, यवत अशा गावांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. पाच वर्षापासून या रस्त्याचे काम टप्याटप्याने चालले असून तीन टप्प्यात या रस्त्याचे काम चार किलोमीटरपर्यंत पूर्ण केले आहे. (Daund News) परंतु 100 ते 200 फुटापर्यंत काम अद्याप बाकी आहे. सध्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, खडी विस्कटली गेली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून
ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.
देलवडी हे जवळपास 4000 लोकसंख्येचे गाव तसेच नाथचवाडी येथील सुमारे 300 लोकसंख्येची वस्ती या रस्त्यामुळे विस्कटली गेली आहे. रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे की पावसाळ्यात पायी चालणेदेखील अवघड होते. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असल्याने गाडी चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. (Daund News) या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर दुग्धव्यवसाय करतात. सकाळ – संध्याकाळ दूधविक्रीसाठी शेतकर्यांना केडगाव, खुटबाव, राहु, पिंपळगाव, यवत येथे ये-जा करावे लागते. भरलेल्या दूध कॅनसह गाडी चालविणे मुश्कील होते. त्यातून अनेकांचा अपघातदेखील झाला आहे. रस्त्याच्या आजूबाजूला शेती असल्याने ट्रॅक्टर आदी वाहनांनी रस्त्याची शकल बिघडली आहे.
विद्यार्थ्यांना करावा लागतो खडतर प्रवास
खुटबाव, केडगाव, यवत, राहु याठिकाणी विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. या विद्यार्थ्यांना खडतर प्रवास करत शिक्षण घ्यावे लागत आहे. अनेकांचे शिक्षण अर्धवटच सुटते. दोन्हीगावातली ग्रामस्थांना बँकेचे काम, शेती उपयोगी वस्तू, बाजार, किराणा माल आदी कामानिमित्त इतर गावामध्ये यावे लागते. तेव्हा गरोदर स्त्रिया, वृद्ध यांचे प्रचंड हाल होतात. (Daund News) या समस्येविषयी प्रशासनाने लवकरात – लवकर लक्ष घालावे अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्ग तसेच स्थानिकाकडून होत आहे.
रस्त्यावरून प्रवास करणे बनले जिकीरीचे
सर्व राजकीय पक्ष म्हणतात की, शासनाच्या सर्व सोयीसुविधा या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण हे फक्त बोलण्यापुरतेच आहे. कारण ग्रामीण भागात अजूनही काही योजना पोहचत नाही. (Daund News) ग्रामीण भाग यापासून किती काळ वंचित ठेवणार? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. परंतु ग्रामीण भागात अजूनही रस्ते नाहीत. ग्रामीण भागातील रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे बनले असून प्रशासनाने लवकरात – लवकर लक्ष घालावे.
– शिवाजी वांझरे, ग्रामस्थ, देलवडी
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : यवत पोलीस स्टेशनवर गोरक्षकांचा ‘चिल्लर फेक’ मोर्चा; पोलीस प्रशासनाचा निषेध
Daund News : दौंड नगरपरिषदेच्या प्रकल्प अभियंत्यास दहा हजारांची लाच घेताना अटक
Daund News : दौंडमधील भूमिगत उच्चदाब वाहिनीचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते भूमिपूजन