उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील आखिल तळवाडी मित्र मंडळाचा श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी दहीहंडी फोडण्याचा मान पिंपळगाव येथील श्री सिद्धेश्वर गोविंदा पथकाने पटकविला. यावेळी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह पंचक्रोशीतील तरुणाई सहभागी झाली होती.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सव सालाबाद प्रमाणे सलग 22 व्या वर्षापासून मंडळाकडून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यावेळी हजारो नागरिकांनी गोपाळ काल्याचा व सोहळ्याचा आनंद लुटला.
यावेळी डीजेच्या लावण्यावर व गाण्यावर गोपालभक्तानी व महिलांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला. या दहीहंडीत अनेक संघानी सहभाग नोदंवला होता. यावेळी श्री सिद्धेश्वर गोविंदा पथकाने 6 थर लावून रोख रक्कम व चषक पटकाविले. श्री सिद्धेश्वर गोविंदा पथकाला कै. विजया (नानी) सूर्यकांत रानवडे यांच्या स्मरणार्थ ओंकार सूर्यकांत रानवडे (सोनाई ग्रुप) याच्या तर्फे सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देण्यात आले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन, उरुळी कांचनचे सरपंच अमित (बाबा) कांचन, माजी सरपंच भाऊसाहेब कांचन, संतोष कांचन, राजेंद्र कांचन, माजी उपसरपंच सुनिल कांचन, डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, मंडळाचे अध्यक्ष अनिल कांचन, भरत काळे, जयेश कांचन, प्रतीक कुंजीर, सुनील लिंभोरे, नितीन लोखंडे, स्वप्नील कोतवाल, राजू शेख, राजू खेडेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.