Dagdusheth Ganapati | पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आणि सकाटा सीड इंडिया प्रा. लि. कंपनीच्या वतीने पहिल्यांदाच सुर्यफुलांचा अभिषेक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मंगळवारी करण्यात आला.
मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल २१ हजार सूर्यफुलांची आरास…
मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.जय सिंग यांनी उपक्रमाकरिता विशेष सहकार्य केले.
सजावटीमध्ये लावण्यात आलेल्या सूर्यफुलांमध्ये तेलबिया येत नसून या फुलांचा वापर केवळ सजावटीसाठी केला जातो. फुलांच्या पाकळ्यांचा रंग गडद भगवा असून मध्यभाग काळा आहे. ही फुले दिसायला खूप आकर्षक असून शेतातून काढल्यानंतर ७-८ दिवस पाण्यामध्ये व्यवस्थित राहतात.
दरम्यान, मंदिराच्या कळसावर लावण्यात आलेल्या फुलांवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे ही फुले अधिकच उठून दिसत होती. भाविकांनी ही आरास पाहण्यासोबतच हे दृश्य आपल्या मोबाईल मध्ये टिपण्याकरिता मोठी गर्दी केली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : भाटघर धरणात तरुणी बुडाली ; शोधकार्य सुरु..!
Pune Accident : भीषण अपघाताने पुन्हा पुणे हादरले! इनोव्हा-पिकअपच्या धडकेत ५ ठार 2 जखमी
Pune News | वर्षानुवर्षे दुभंगलेले चार संसार लोकन्यायालयात जुळले