Crime News | शिक्रापूर : सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका बांधकाम ठेकेदाराचे अपहरण करून आधी २० हजार रुपयांची प्रतिमहिना खंडणी मागितली. खंडणी देण्यास नकार दिल्याने ठेकेदारास बेदम मारहाण करणाऱ्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.
ऋषिकेश अशोक दरेकर (रा. सणसवाडी,ता. शिरुर) व रतन दत्तात्रय कामठे (रा. धानोरे ता. शिरुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बापूराव आश्रुबा बहिर (वय ३८ रा. रामनगर पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बापूराव बहिर हे एक बांधकाम ठेकेदार आहे. ते सणसवाडी (ता. शिरुर) येथे वेगवेगळ्या ठिकाणी बांधकाचे ठेके घेऊन काम करतात. या कामातूनच बहिर आणि आरोपी ऋषिकेश दरेकर याच्याशी ओळख झालेली आहे.
दरम्यान, आरोपी ऋषिकेश याने २२ मार्चला फोन करुन बापूराव यांना सणसवाडी चौकात बोलावून घेतले. बापूराव चौकात गेल्यानंतर आरोपी ऋषिकेश व रतन या दोघांनी आमच्या गावात काम करतो. आम्हाला महिन्याला २० हजार रुपये द्यावे लागेल. असे म्हणून बापूराव यांना शिवीगाळ, दमदाटी केली.
बचाव करण्यासाठी पैसे देण्याचे कबूल…
त्यांनतर बापूराव यांना कार मध्ये बसवून सराटे वस्ती येथे घेऊन गेले. त्यानंतर त्यांचे हात बांधून शिवीगाळ व दमदाटी केली. बापूराव यांची त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी पैसे देण्याचे कबूल केले. आणि थेट शिरूर पोलीस ठाणे गाठले.
याप्रकरणी बापूराव बहिर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार ने शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Crime News | सोनू निगमच्या वडिलांना चोरट्याचा हिसका, घरातील ७२ लाखावर मारला डल्ला
Pune : चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची ग्रामीण भागात प्रसिद्धी