इंदापूर : तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूरच्या राष्ट्रीय छात्र सेना , विद्यार्थी कल्याण मंडळ , वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाचे औचित्य साधत राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे , उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकता रॅली , संविधान सामान्य ज्ञान परीक्षा, संविधान उद्देशिकेचे वाचन व व्याख्यानाचे आयोजन करीत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
26 नोव्हेंबर रोजी संविधान सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. 27 नोव्हेंबर रोजी संविधान प्रत अर्पण केलेल्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच यावेळी उद्देशिकेचे वाचन करून सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. 29 नोव्हेंबर रोजी इंदापूर महाविद्यालय ते इंदापूर नगरपरिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत खडकपुरा ते इंदापूर महाविद्यालय विद्यार्थ्यांनी घोषणा देत एकता रॅली काढण्यात आली.
विज्ञान विभाग प्रमुख डॉ.शिवाजी वीर , राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र साळुंखे, विद्यार्थी विकास अधिकार डॉ. तानाजी कसबे, डॉ दिनेश जगताप, प्रा.प्रशांत साठे प्रा.धनंजय माने , प्रा. सुवर्णा जाधव यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केला.