भोर : भोर काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य सतीश चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. सतीश चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भोर विधानसभेत काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
विद्यमान आमदारांची एकाधिकारशाही, मनमानी कारभार व तालुक्याचा रखडलेला विकास यामुळे चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सतीश चव्हाण यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे भोर आणि परिसरात पक्षाच्या वाढीसह विधानसभा निवडणुकीत चांगला फायदा होईल, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.