सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
पुरंदर: पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी होणाऱ्या भूसंपादनात किती मोबदला मिळेल, पुनर्वसन होणार का? किती जमीन संपादित होईल, याविषयी ग्रामस्थांमध्ये संभ्रम अवस्था असल्याने, भूसंपादन अधिकाऱ्यांच्या संवाद सभेकडे पाठ फिरवण्यात आली. त्यामुळे आता या संपादना पोटी चारपट मोबाईल देण्यात येईल, प्रत्येक गावातील ठराविक जमीन संपादित केली जाईल, गावठाणे कायम राहतील अशी माहिती ग्रामस्थांपर्यंत, पोहोचवणे जिल्हा प्रशासना समोर आव्हान आहे. दरम्यान या सातही गावातील सातबारा उतारे अद्यावत करणे, पिकांची नोंद करणे, तसेच वारस नोंदी पक्क्या करणे, ही कामे येथे आठवडाभरात पूर्ण करून, त्यानंतर संयुक्त मोजणीस प्रारंभ करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनास सांगण्यात आले होते.
“भूसंपादनापोटी किती जमीन द्यावी लागेल, संपादन झालेल्या जमिनीसाठी किती मोबदला मिळेल, घरे जातील का? गेल्यास पुनर्वसन होईल का? अशा अनेक शंका ग्रामस्थांच्या मनात असल्याची स्थानिक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य सरकारच्या 2013 च्या भूसंपादन कायद्यानुसार चारपट मोबदला देण्याचे ठरले आहे. हे ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावे लागणार आहे. त्यासाठी आणखी संवाद वाढवावा लागणार आहे. एक दोन सभा मधून ही होणार नाही, सातबारा उतारे अद्यावत झाल्यानंतर संयुक्त मोजणीला प्रारंभ करण्यात येईल”, असे डॉ. कल्याण पांढरे, जिल्हा भूसंपादन समन्वयक यांनी सांगितले आहे.
“ग्रामस्थांची संवाद सुरूच राहील, येत्या सोमवारी दि. 14 पारगाव तसेच अन्य ठिकाणी संवाद सभा घेणार आहोत. वर्षा लांडगे”, उपविभागीय अधिकारी पुरंदर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, जमिनी देताना गावकऱ्यात संभ्रम अवस्था असल्यामुळे, संवाद साधताना पाठ फिरवण्यात आल्याचे दोन्ही गावातील चित्र होते. कुंभारवळण येथील सभेत सरपंच मंजुषा गायकवाड यांनी ग्रामस्थांचा या भूसंपादनास विरोध असल्याचे, पत्र जिल्हा भूसंपादन समन्वयक डॉ. कल्याण पांढरे आणि उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांच्याकडे सोपविले. गायकवाड यांच्या सह कल्पना कुंभारकर आणि पांडुरंग कामठे या दोघांनी सभेस हजेरी लावली, मात्र त्यात त्यांनी आपले म्हणणे मांडले नाही. मात्र शेतामधील घरे संपादित करून, त्याला स्वतंत्र मोबदला दिला जाईल, बागायती ,जिरायती क्षेत्राला वेगळा मोबदला मिळेल, अशी अचूक माहिती जिल्हा प्रशासनाकडून ग्रामस्थांना देण्याची मोठे आव्हान असेल, त्यासाठी एका फेरीतच ग्रामस्थ भूसंपादनस तयार होतील असे मानण्याचे काही कारण नसून ,स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी, एमआयडीसीच्या अधिकारी यांनी ग्रामस्थांना संपदांना बाबत अचूक माहिती द्यावी. अशी सूचना पांढरे यांनी यावेळी केली.
नागरिकांची मानसिकता तपासून त्यांच्याशी संवाद साधावा लागणार आहे. त्यांच्यावर कोणताही दबाव न टाकता राज्य सरकारच्या सूचनानुसार काम करावे, कर्मचाऱ्यांनी सरकारची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे. चुकीची माहिती दिली जाऊ नये, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवू शकते. त्यासाठी पोलिसांनी खबरदारी घ्यावी .अशी सूचना पांढरे यांनी यावेळी केली.
भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी सातबारा उतारे अचूक असावेत त्यासाठी तलाठी ने जमीनची रेकॉर्ड अद्यावत करणे, वारस नोंदी, पीक पाणी करून, सातबारा उतारा अद्यावत करावा, असे निर्देश पांढरे यांनी यावेळी दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, पाणीपुरवठा उप अभियंता पुरंदर सचिन घुबे आदी उपस्थित होते.