नवी दिल्ली : शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. त्यात अवघ्या 24 तासांत पाय नेटवर्क क्रिप्टोकरन्सीने परिस्थिती पूर्णपणे उलटली आहे. 24 तासांच्या परताव्याच्या बाबतीत, बिटकॉईन आणि इथेरियमसह जगातील प्रमुख क्रिप्टोंना मागे टाकले आहे. एका वेबसाईटनुसार, गेल्या 24 तासांत पाय कॉइनने सुमारे 30 टक्के परतावा दिला आहे.
शनिवारी रात्री 8 च्या सुमारास पाय कॉईनची किंमत $0.7816 (सुमारे 67 रुपये) वर पोहोचली होती. गेल्या काही दिवसांपासून पाय नेटवर्कमध्ये घट होत आहे. यामुळे, या क्रिप्टोवरील गुंतवणूकदारांचा विश्वास लक्षणीयरीत्या कमी होत चालला होता. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे फेब्रुवारीमध्ये या क्रिप्टोचे लाँचिंग खूपच स्फोटक होते. तसेच या क्रिप्टोचे वर्णन पुढील बिटकॉईन म्हणून केले जात होते. पण लाँच झाल्यानंतर ते कमी होऊ लागले.
पाय नेटवर्कने फक्त 24 तासांत परतावांचा मार्ग बदलला. 24 तासांपूर्वी, म्हणजे शुक्रवारी रात्री 8 वाजता, त्याची किंमत $0.6027 होती. आता शनिवारी रात्री 8 वाजता, हा क्रिप्टो $0.7816 वर आला आहे. अशा परिस्थितीत, त्याने केवळ 24 तासांत गुंतवणूकदारांना सुमारे 30 टक्के इतका मोठा परतावा दिला आहे.
7 दिवसांत किंमत वाढली 65 टक्क्यांनी
केवळ 24 तासांतच नाही तर गेल्या 7 दिवसांतही या पाय नेटवर्कने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. गेल्या 7 दिवसांत या शेअरने सुमारे 65 टक्के परतावा दिला आहे. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांच्या एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर फक्त 7 दिवसांत 1.65 लाख रुपयांमध्ये झाले. म्हणजेच, फक्त 7 दिवसांत त्याला 65 हजार रुपयांचा नफा झाला.