उरुळी कांचन (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील तारामती कोंडीराम चौधरी (वय ८०) यांचे मंगळवारी (ता. १३) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुली, २ मुलगे असा मोठा परिवार आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक शांताराम कोंडीराम चौधरी व उरुळी कांचन येथील मणिभाई पतसंस्थेचे संचालक कांतीलाल चौधरी यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.