पुणे : ‘तू खूप आवडतेस, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, आपणच लवकरच लग्न करू’ असे आमिष दाखवून आतेभावाने अल्पवयीन तरुणीशी तिच्या इच्छेविरूद्ध शरीरसंबंध ठेवून फसवणूक केल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी आरोपीचा तपास सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी प्रसाद दत्तात्रय भाले (वय १८, रा. शेडगाव टाकली, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याच्याविरूद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. आरोपी भाले हा फिर्यादीच्या आत्याचा मुलगा आहे. गणेश उत्सवानिमित्त २५ ऑगस्ट २०२३ रोजी तो फिर्यादीच्या घरी आला होता. त्यावेळी दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी घरी टीव्ही पाहत असताना आरोपी भाले हा फिर्यादी तरुणीजवळ आला व म्हणाला की, मला तू खूप आवडतेस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपणच लवकरच लग्न करू, असे आश्वासन त्याने फिर्यादीला दिले. गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शरीरसंबंध ठेवले.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गांधले अधिक तपास करत आहेत.