शिरूर : शासकीय नवोपक्रम पुणे जिल्हा प्रथम क्रमांक प्राप्त असणारी शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला जिल्हा परिषद शाळेत प्रजाकसत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजवंदन, सामाजिक योगदान सत्कार समारंभ आदी कार्यक्रम पार पडले.
माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील व पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र प्रजाकसत्ताक दिनाचे औचित्य
साधून उपस्थित मान्यवरांना हस्ते पत्रकार युनूस तांबोळी यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, माजी सरपंच गायत्री चिखले, मनीषा खेडकर, सरपंच महेंद्र डोळस, शालेय समिती अध्यक्ष माजी अध्यक्ष अर्चना खळदकर, शेखर पाटेकर, सुनील बापू सोनवणे, शालेय समिती अध्यक्ष कल्पना खळदकर, मुख्याध्यापक राहुल चातुर, सहशिक्षक कांताराम शिंदे, उपसरपंच जयश्री सोनवणे, मनीषा चिखले, निकिता खेडकर, अनिता बडदे,पोलीस पाटील संतोष जाधव, माजी उपसरपंच मोहन चिखले, विजय खेडकर, संदीप सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल चिखले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पत्रकारीतेच्या माध्यमातून पत्रकार युनूस तांबोळी यांनी मोलाचे योगदान दिले. मुख्याध्य़ापक राहुल चातूर यांच्या ‘शिक्षणाची गाडी’ हा उपक्रम चांगलाच नावारूपाला आला. त्याबद्दल हे जिल्हा परिषद शाळेने हे प्रमाणपत्र सन्मापुर्वक देऊन त्यांचा सन्मान केला. त्याप्रमाणे शाळेच्या भौतिक सुविधासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन शरद नानाभाऊ खळदकर यांनी केले होते.