लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर (ता. हवेली) येथील चिंतामणी कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 77.77 टक्के लागला आहे. तसेच यावर्षी विद्यार्थिनींनी बाजी मारली असून विद्यालयात पहिले तीनही नंबर मुलींचेच आले आहेत. अशी माहिती प्राचार्य बाळासाहेब नेवाळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये विद्यालयाचे 18 विद्यार्थी बसले होते. तर एक विद्यार्थ्याने परीक्षा दिली नव्हती. या परीक्षेचा निकाल मंडळाच्या वतीने मंगळवारी (ता.२१) दुपारी १ वाजण्याच्या सुमारस ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला.
बारावीच्या परीक्षेत 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ऋतुजा देशमुख हिने कला शाखेतून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर धनश्री विठ्ठल गावडे हिने द्वितीय तर प्रियंका प्रकाश पवार हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांचे थेऊरसह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. तर उर्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नेवाळे यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.