राहुलकुमार अवचट
Chhagan Bhujbal Effigy Burn : यवत (पुणे ) : सर्वत्र मराठा आरक्षणाबाबत मनोज सारंगे पाटील यांच्या सभा होत आहेत. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मंत्री छगन भुजबळ हे सातत्यानं वक्तव्य करत असतात. नुकतच त्यांनी विधान केल्याप्रकरणी दिनांक १९ रोजी सकाळी नऊच्या सुमारास कुसेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणा देऊन प्रतिमेचे दहन केले.
यावेळी जमावाने निषेध सभेची परवानगी न घेता जमाव जमवला. महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या विधानाचा निषेध करत मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणा देऊन प्रतिमेचे दहन केले. पुणे जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्याबाबत पोलिस कॉन्स्टेबल गणेश महादेव मुटेकर यांच्या फिर्यादीवरून १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांची नावे मनोज वसंतराव फडतरे, मनेश शिवाजी शितोळे, हनुमंत सतिश शितोळे, सागर बाळासाहेब शितोळे, विशाल अनिल शितोळे, सौरभ बाळासाहेब शितोळे, संतोष हनुमंत शितोळे, महेश त्रींबक शितोळे, किरण मारुती शितोळे, धिरज लक्ष्मण शितोळे, संतोष व्यंकट शितोळे, प्रभाकर मधुकर शितोळे, मोहन विनायक शितोळे, संतोष सदाशिव शितोळे (सर्व रा. कुसेगाव, ता. दौंड,जि. पुणे) या १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.