इंदापूर: 1985 साली मी एकदा नव्हे तर दोनदा मुंबईचा महापौर आणि आमदारही झालो. एवढेच नव्हे तर भारतातील महापौरांचा अध्यक्षही झालो, तू सरपंच तरी होऊन दाखव, असं म्हणत ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली.
पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये ओबीसी समाजाच्या वतीने महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत जरांगे पाटलांवर टीका केली.
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिले जाईल. मला राज्य सरकारला देखील सांगायचं आहे. जर तुम्ही आता वेळेवर कारवाई केली नाही, तर तर तुम्ही पुढे जाऊन काहीही करू शकणार नाही. रात्री दोन वाजता त्यांना सभेसाठी परवानगी मिळते. तसेच ते म्हणतील तो कायदा. पोलीसही कारवाई करत नाहीत. मी तर पंधरा दिवसांतून एकदाच बोलायला उभा राहतो. परंतु, आमचं काम म्हणजे ‘सौ सोनार की एक लोहार की’ असं म्हणत भुजबळांनी जोरदार हल्ला चढविला.