Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोरेगाव मूळ गोळीबार प्रकरण : दशरथ शितोळेच्या बंगल्यातून तब्बल 175 जिवंत काडतुस तर पिस्टलचे 40 जिवंत काडतुस जप्त

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 16 September 2024, 13:11

उरुळी कांचन, (पुणे) : आर्थिक देवाण – घेवाणीतुन उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न करणारा उद्योजक दशरथ उर्फ बापू शितोळेला रेल्वे रुळाच्या पलीकडे असलेल्या शेतातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पोलिसांनी एक बंदुक, 175 जिवंत काडतुस व पिस्टलचे 40 जिवंत काडतुस केले हस्तगत केले. याप्रकरणी एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) व उरुळी कांचन ग्रामीण पोलिसांनी हि कारवाई केली आहे.

 

आरोपी बापू उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे (वय – 46), निलीमा बापु उर्फ दशरथ शितोळे (वय – 42), जिग्नेश बापु उर्फ दशरथ शितोळे (वय-19), आशा सुरेश भोसले (वय-52), निखील अशोक भोसले (वय- 25), सर्व रा. इनामदारवस्ती, कोरेगाव मुळ ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने बुधवार (ता. 18) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शेतकरी काळुराम महादेव गोते व शरद कैलास गोते (दोघे रा. भिवरी ता. हवेली) यांचे आरोपी बापू उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे यांच्याशी आर्थिक व्यवहार होते. सदर व्यवहारामध्ये गोते यांचे शितोळे यांच्याकडे चाळीस लाख रुपये दीड वर्षापूर्वी दिले होते. काळुराम गोते यांना त्यांचे पैसे परत देतो माझ्या घरी या असे सांगितले होते.

घरी बोलावून पैसे परत मागितल्यांच्या रागातून बापू शितोळे यांनी त्यांच्याकडे परवाना असलेले पिस्टल मधुन काळुराम गोते यांच्यावर जिवे ठार मारण्याचे उद्देशाने चार राउड फायरिंग केले. यामध्ये काळूराम गोते यांना हाताला व पायाला गोळ्या लागुन गंभीर जखमी करण्यात आले आहे. तसेच शरद गोते यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, उरुळी कांचन सारख्या मध्यवर्ती गजबलेल्या गावाजवळ फायरींग झाल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, उरुळी कांचन पोलीस स्टेशन कडील वेगवेगळी पथके तयार करुन आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. गोपनीय स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, गुन्हयातील मुख्य आरोपी हा रेल्वे रुळाच्या पलीकडे असलेल्या शेतामध्ये लपुन बसलेला आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अधिक तपास केला असता सदर गुन्हा हा आरोपी बापु शितोळे यांने त्याचे कुटुंबातील इतर सदस्यांनी केला असल्याची कबुली आरोपी शितोळे यांनी दिली.

बापू शितोळे यांच्या बंगल्यातून 175 काडतुसे जप्त…

सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बुधवार (ता. 18) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जखमी काळूराम गोते याच्यावर नोबेल हॉस्पीटल येथे उपचार सुरु असुन त्यांच्यावर 03 काडतुस फायर करण्यात आले आहेत. सदर गुन्हयाचे अनुषंगाने 1 बंदुक व 175 जिवंत काडतुस पिस्टलचे जिवंत 40 काडतुस, दोन बॅरल, 03 खाली मॅग्झीन जप्त करण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहूल गावडे, सपांगे, पोलीस उपनिरीक्षक अमित सिद-पाटील, काशीनाथ राजापुरे उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार बाळासाहेब कोरडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, धीरज जाधव, विजय कांचन, विनोद पवार, स्वप्नील अहिवळे, बाळासाहेब खडके, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील अंमलदार अजित काळे, रमेश भोसले, प्रमोद गायकवाड, प्रवीण चौधर, मनिषा कुतवळ, यांनी केली असून पुढील तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील हे करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

एकाने डोक्याचे केस पकडले तर दुसऱ्याने चाकूचा धाक दाखवत महिलेवर सामूहिक बलात्कार; आरोपी फरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.