राजू देवडे
लोणी धामणी : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाला आंबेगाव तालुक्यातील विविध गावांतून कॅन्डल मार्च काढून पाठींबा दर्शविला जात आहे. तालुक्यातील मेंगडेवाडी, जारकरवाडी, धामणी, पोंदेवाडी, वळती, म्हाळुंगे पडवळ आदी गावांत मराठा समाज बांधवांनी कॅन्डल मार्च काढला आहे.
अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पुणे जिल्ह्यातून पाठिंबा मिळत आहे. राज्यभरातील अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात पाठिंबा दिला जात आहे. याचाच भाग म्हणून पोंदेवाडी (ता. आंबेगाव) या ठिकाणी कॅन्डल मार्च काढून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यात आला.