उरुळी कांचन, (पुणे): गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोने-चांदीचे दागिने खरेदी करून ग्राहकांचा आनंद द्विगुणीत व्हावा, यासाठी शहरातील ससाणेनगर, हडपसर व ग्रामीण भागातील उरुळी कांचन येथील सर्व ज्वेलर्स दुकाने रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होती. जे. बी. सराफ ज्वेलर्समध्ये ग्राहकांकडून दिवसभर सोने खरेदी करताना मोठी गर्दी पाहायला मिळाली. गुढीपाडव्याबरोबरच सोमवारी रमजान ईद असल्याने ग्राहकांनी चोख सोने, दागिने आणि बुकिंग केले. अशी माहिती जे. बी. सराफ व ज्वेलर्सचे भागीदार ॲड. प्रसाद बेदरे यांनी दिली.
गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे सोने खरेदीसाठी अत्यंत महत्त्वाचे सण मानले जातात. यंदा सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली असून प्रति दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 90 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे, सोन्याचा भाव वाढला असला तरी ग्राहकांकडून सोने खरेदी करण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे जे. बी. सराफ ज्वेलर्समध्ये ग्राहकांकडून दिवसभर सोने खरेदी करताना मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी पारंपरिक दागिने, मंगळसूत्र, बांगड्या, अंगठ्या, नाणे आणि सोन्याच्या बारच्या स्वरूपात गुंतवणूक केली.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ज्वेलर्स दुकानांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती. दागिन्यांसह चोख सोन्याची नाणी आणि वळी खरेदीसाठी ग्राहकांची पसंती होती. त्याचबरोबर लग्न समारंभासाठी लागणार्या दागिन्यांचे बुकिंगही गुढी पाडव्याच्या शुभदिनी समाधानकारक झाले असल्याचेही ॲड. प्रसाद बेदरे यांनी सांगितले.
दरम्यान, रविवारचा शुभमुहूर्त ग्राहकांनी टाळला नाही हेच दिसून आले. आगामी काळात सोन्याची किंमत आणखी वाढली तर गैरसोय होवू नये, त्याचवेळी सोन्याची गुंतवणूक सुरक्षित असल्याने युवापिढी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी आघाडीवर होते. रविवारी गुढीपाडव्याचा मुहूर्त आणि सोमवारी रमजान ईद असल्याने बहुसंख्य ज्वेलर्स दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली.
दर वाढले तरी प्रतिसाद..
चोख सोन्याच्या एका तोळ्याची किंमत 90 हजार रुपये असून 1 किलो चांदीची किंमत 1 लाख 5 हजार रुपये आहे. सोने-चांदीचे दर वाढले असले तरी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सोन्याचा भाव (प्रति दहा ग्रॅम)
24 कॅरेट – 90092
22 कॅरेट – 82956
चांदी – 101200 (प्रतिकिलो)
सोन्याच्या उत्कृष्ट दागिन्यांची मागील 52 वर्षापासून विश्वासाची परंपरा जपणारे उरुळी कांचन व येथील जे. बी. सराफ व ज्वेलर्स यांना आपल्या विविध आकर्षक ऑफर् मुळे नेहमीच ग्राहकांची पहिली पसंती असते. त्यामुळे आपल्या आकर्षक डिझाईन्स् व तत्पर सेवांमुळे ग्राहकांना आपलेसे करणारे आहे. आपल्या उत्कृष्ट सेवा आणि आकर्षक ऑफर्सने ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केलेल्या जे. बी. सराफ व ज्वेलर्स आगामी काळातही ग्राहकांना अशाच सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे.
ॲड. प्रसाद बेदरे भागीदार, जे. बी. सराफ व ज्वेलर्स