संदीप टूले
केडगाव (दौंड) : सुरुवातीच्या काळात ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ ऑफिसला अनेक फेऱ्या माराव्या लागत असत. ड्रायव्हिंग लायसन्स काढणाऱ्या एजंटच्या माध्यमातून ड्रायव्हिंग लायसन्स काढले जात होते. ड्रायव्हिंग लायसन्स काढणाऱ्या एजंटच्या माध्यमातून भरपूर असे पैसे लुटले जातात म्हणून व गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी व आरटीओच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केले. पण हे गैरप्रकार काही कमी होत नाही असे दिसते. कारण केडगावमधील पती-पत्नी अशिक्षित लोकांना हेरून बनावट ड्रायव्हिंग लायसन्स बनवून देण्याचे काम जोरात सुरू आहे.
केडगावमधील हे दांपत्य अशिक्षित तसेच गरजवंत लोकांना हेरून ड्रायव्हिंग लायसन्स काढून तसेच नूतनीकरण करून देतो, गाड्यांचे हरवलेले कागदपत्रे काढून देतो, अनधिकृत गाड्या अपुरे कागत्रपत्रे असेल तरीही नावावर करून देतो, असे म्हणून लोकांकडून पैसे उकळतात.
तसेच घरच्या घरी कागदपत्रे तयार करतात व पीव्हीसीचे बनावट ड्रायव्हिंग लायसन्स कार्ड सेम टू सेम संबंधित व्यक्तीच्या घरी पोस्टाने पाठवतात. जे कार्ड आरटीओ कार्यालयात ऑनलाईन दिसत नाही. ना त्याचे काही रेकॉर्ड मिळते. जेव्हा हा प्रकार संबंधित लायसन्सधारकाच्या लक्षात येते तेव्हा हे बंटी आणि बबलीची जोडी उडवाउडवीची उत्तरे देऊन मोकळे होतात. आज होईल, उद्या होईल, असे करून फसवतात.
तसेच शेवटी संबंधितांना कोणाला काही सांगू नका नाहीतर बघून घेऊ अशी धमकी दिली जाते. हा प्रकार भरपूर दिवसापासून चालू असल्याची खात्रीलायक माहिती आहे. तसे पाहता हे प्रकरण खूप गंभीर स्वरूपाचे असून, संबंधित प्रशासन याकडे किती गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन या बंटी बबलीपर्यंत पोहचून गुन्हा दाखल करणार का हे पाहणे उत्सुतेचे ठरणार आहे.