Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी उत्तम प्रशासन आवश्यक; डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे मत

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 22 December 2023, 19:58

राहुलकुमार अवचट

पुणे : मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आणि प्रचारासाठी उत्तम प्रशासन आवश्यक असून, ते एकप्रकारे मानवाधिकाराचे कवच आहे. सामान्य नागरिकांना न्याय देताना लोकसेवकांकडून नागरिकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे, असे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगितले.

राष्ट्रीय मानवाधिकार आयेागाकडे प्राप्त झालेल्या मानावाधिकारांच्या उल्लंघनांच्या तक्रारींवर सुनावणीदरम्यान विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरदृष्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना डॉ. ज्ञानेश्वर मुळे बोलत होते. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, विभागीय उपआयुक्त रामचंद्र शिंदे, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक सुनिल फुलारी, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पश्चिम क्षेत्र तुरुंग पोलीस उपमहानिरिक्षक स्वाती साठे, येरवडा मध्यवर्ती तुरुंग अधीक्षक सुनिल भामल, कोल्हापूर मध्यवर्ती तुरुंग अधीक्षक भारत भोसले, गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापूरे, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त आदित्या तलवार यावेळी उपस्थित होते.

 

यावेळी डॉ. मुळे म्हणाले, मानवाधिकाराबाबत जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना कराव्यात. त्यामध्ये नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्यात यावा. राष्ट्रीय तसेच राज्य मानावाधिकार आयोगातर्फे याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. मानवाधिकार आयेागातर्फे मानावाधिकारासंबधी पोलीसांना नियमित प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

मानवाधिकारासंबधी मार्गदर्शक सूचना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आल्या असून, त्याची अंमलबजावणी प्रशासनाने करण्याचे निर्देश डॉ. मुळे यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी मानवाधिकाराच्या संरक्षणासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. विशेष मोहिम राबवून मानवी नालेसफाई पूर्णपणे बंद करणे, वेठबिगारीला आळा घालणे, तसेच तृतीयपंथीयांची मतदारयादीमध्ये नोंदी करण्याबाबत कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदूर्ग आणि अहमदनगर जिल्ह्यातील मानवाधिकार उल्लंघनाच्या प्रकरणांचा आढावा आयोगाने घेतला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post
Kunjirwadi sarpanch anju gaikwad disqualified by pune district collector

मोठी बातमी! कुंजीरवाडीच्या सरपंच अंजू गायकवाड अपात्र; निवडणूक खर्चाचा हिशोब वेळेत सादर न केल्याने गेले सदस्यपद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.