Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचनजवळील शिंदवणे येथे रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार; विजेत्याला मिळणार बुलेट

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 28 December 2023, 19:02

उरुळी कांचन, (पुणे) : श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून दौंडचे आमदार राहुल कुल व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य बैलगाडा शर्यतींचे (ओपन मैदान) ‘आमदार हिंदकेसरी २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे.

शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (ता. ३१) सकाळी ९ वाजल्यापासून या बैलगाडा शर्यतीचे आयोजन सचिन मचाले व रायबान ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष सहकार्य डाळिंब (ता. दौंड) ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सागर म्हस्के यांचे असल्याची माहिती आयोजक सचिन मचाले यांनी दिली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ते सात क्रमांकापर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्याला बुलेट, द्वितीय विजेत्याला युनिकॉर्न, तृतीय, चतुर्थ विजेत्यांना आकर्षक दुचाकी, तसेच पाच, सहा व सात नंबरच्या विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहे.

बैलगाडा शर्यतीसाठी घाटाची दुरुस्ती करण्यात आली असून, सर्व जय्यत तयारी केली आहे. रविवारी सकाळी साडे आठ वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत घाटाची पूजा करून या बैलगाडा शर्यतीचा प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 7350027238, 9850859851, 8767465769 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धेचे मुख्य संयोजक सचिन मचाले यांच्याकडून करण्यात आले आहे.

 

दरम्यान, बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यापासून नियम-अटींची पूर्तता करत या शर्यती पार पाडल्या जात आहेत. शर्यतीच्या आयोजनामुळे ग्रामीण अर्थकारणावर अनुकूल परिणाम झाला आहे. शर्यतीच्या ठिकाणी लाखोंची उलाढाल होत आहे. तर बैलजोडीला पुन्हा महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे खिलार बैलजोडीच्या किमती या लाखोंच्या घरात गेल्या आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post
3200-police-personnel-deployed-at-koregaon-bhima-on-the-occasion-shaurya-din

शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा इथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त; 3200 पोलीस कर्मचारी तैनात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.