लोणी काळभोर Buddhist Rally : किल्लारी ते चैत्यभूमी दादर (मुंबई) येथे चाललेल्या बौद्ध धम्म पद रॅलीचे (Buddhist Rally) लोणी स्टेशन (ता. हवेली) येथील चौकात मंगळवारी (ता.९) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. (Buddhist Rally)
बौद्ध धर्मगुरुंचे पुष्पहार देऊन स्वागत
लोणी स्टेशन येथील चौकात बौद्ध धर्मगुरुंचे (भिक्षुंचे) आगमन झाल्यानंतर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पूर्व हवेली, सर्व समाज सेवा संस्था यांच्या वतीने भाजपाचे सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष व पुणे प्राईम न्यूज चे संपादक जनार्दन दांडगे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी सरपंच नंदू काळभोर यांच्या हस्ते पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी रघुनाथ साळवे, रवींद्र कदम, नागसेन ओव्हाळ, रमेश गायकवाड, रमेश निकाळजे, विजय गायकवाड, बापू चोतमहाल, नागेश जेठीथोर, नारायण सुर्वे, सुधीर ओव्हाळ, सुजाता गायकवाड, लक्ष्मी मोरे, सुमन मोरे, छाया ओव्हाळ व बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोणी स्टेशन येथील चौकातून घोरपडे वस्ती येथील बौद्ध विहारापर्यंत बौद्ध धम्म पद रॅली काढण्यात आली. यावेळी धम्मगुरूंनी धम्मदेशना, बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार या विषयांवर बौद्ध अनुयायांना मार्गदर्शन केले. तर या रॅलीचे आयोजन भारतीय बौद्ध महासंघ समता सैनिक दल व सर्व सेवा संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते.
दरम्यान, किल्लारी येथून हि बौद्ध धम्म पद रॅली शुक्रवारी (ता.५, मे) निघाली आहे. ही रॅली शनिवारी (ता.२३ मे) चैत्यभूमी दादर (मुंबई) येथे पोहोचणार आहे. या रॅलीमध्ये ५० हून अधिक बौद्ध भिक्षुंचा समावेश आहे. तर या रॅलीचे आयोजन पूज्य भदन्त धम्मसार, संघमित्रा बौद्ध विहार (किल्लारी) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
सिद्धेश्वर कुरोली येथे बौद्ध संस्काराने चिमुकले देतात शांतीचा संदेश…!
लोणी काळभोर येथील बौद्ध विहार परिसरात संविधान दिन उत्साहात साजरा…!