उरुळी कांचन (पुणे) : हवेली तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीदरम्यान प्रतिनिधी सोडण्यावरून महाविद्यालयाच्या गेटवर प्रचंड गोंधळ सुरु आहे.
चुकीच्या कामकाजामुळे प्रतिनिधी व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी असून, उपस्थित नागरिक गेटवरच घोषणा देत आहेत.
दरम्यान, पोलिंग एजंट व अर्धे उमेदवार बाहेर असून, या ठिकाणी उपस्थित असलेले उमेदवार निषेध घोषणा देत आहेत. या वेळी जे उमेदवार व पोलिंग एजंट आहेत ते अजूनही बाहेरच आहेत. या प्रकारामुळे मतमोजणीला उशीर होत आहे.