Breaking News : उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील बहुचर्चित सरपंच “विठ्ठल राजाराम शितोळे” यांच्या विरोधात सहा महिण्यापुर्वी मंजुर झालेल्या अविश्वास ठरावाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असुन, विठ्ठल शितोळे यांच्या सरपंचपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. विठ्ठल शितोळे यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने, त्यांच्या विरोधकांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. Breaking News
हवेलीचे तहसिलदार किरण सुरवसे यांच्या उपस्थितीत सहा महिण्यापुर्वी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या सभेत, विठ्ठल शितोळे यांच्याविरोधाताली अविश्वास ठराव १० विरुद्ध ३ ने मंजूर झाला होता.यामुळे विठ्ठल शितोळे यांना सरपंचपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. मात्र या ठरावाला उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 20) रोजी स्थगिती दिली आहे. Breaking News
दरम्यान विठ्ठल शितोळे यांनी त्यांच्या विरोधातील ठरावाला, सुरुवातीला जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल केले होते. यात शितोळे यांनी ग्रामपंचायतीमधील चार सदस्यांनी त्यांचे जात पडताळणी सादर न केल्यामुळे त्यांचे पद आपोआप रद्द होते व त्यांना ठरावामध्ये भाग घेणेचा व मतदान करणेचा अधिकार नसल्याचा युक्तीवाद सादर केला, परंतु, जिल्हाधिकारी पुणे यांनी तो फेटाळून लावत अविश्वास ठराव कायम केलेला होता.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाविरोधात विठ्ठल शितोळे यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती व उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी यांचा आदेश रद्द करुन मुळ विवाद अर्ज पुर्ववत करणेचे आदेश दिले व त्यानंतरही जिल्हाधिकरी यांनी दि. १०/०७/२०२३ रोजी शासन परिपत्रकाचा आधार घेवून चार सदस्यांना जात पडताळणी सादर करणेस मुदतवाढ दिल्याचे कारण नमुद करून विठ्ठल शितोळे यांचा अर्ज फेटाळून लावत अविश्वास ठराव कायम केला. त्यानंतरही श्री. विठ्ठल शितोळे यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली.
दरम्यान, उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयामधील निवाडे व कायदेशिर तरतूद विचारात घेवून गुरुवारी (ता. १९) आदेशाने तहसिलदार हवेली यांनी मंजुर केलेल्या शुक्रवारी (ता. २१) रोजीच्या अविश्वास ठरावास स्थगिती दिलेली असल्याने विठ्ठल शितोळे यांचे सरपंदपद पुर्ववत झालेले आहे. सदर कामी अॅड. जी. एस. यवतकर, अॅड. चैतन्य निकते व अॅड. शेखर हरगुडे यांनी विठ्ठल शितोळे यांचे वतीने कामकाम पाहिले. Breaking News
“सत्य परेशान हो सकता है, पराभूत नही” – विठ्ठल शितोळे
दरम्यान निकालाबाबत ‘पुणे प्राईम न्यूज’ शी बोलतांना विठ्ठल शितोळे म्हणाले, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना विठ्ठल शितोळे म्हणाले की, विरोधकांनी माझ्या विरोधात कुभाड रचले. मात्र न्यायालयाने मला निकाल दिला आहे. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. या पुढील काळात कोरेगाव मुळच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्न करणार आहे. मला राजकारणापेक्षा समाजकारण अधिक महत्त्वाचे आहे. असेही शितोळे यांनी यावेळी स्पष्ठ केले.