Breaking News : पिंपरी : केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह हे शनिवारी रात्री पुण्यात दाखल झाले. ते आज पिंपरी-चिंचवड येथे रामकृष्ण मोरे सभागृहात होणाऱ्या सहकार परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना सीआरपीसी १४९ च्या नोटिसा दिल्या आहेत. तर सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या मोहननगर येथील निवासस्थानी सकाळी सहा वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. भापकर यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
मारुती भापकर घरामघ्ये स्थानबद्ध
अमित शहा आज बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे उद्घाटन करणार आहेत. दरम्यान, त्याच्या दौऱ्यानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी खबरदारी म्हणून विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना सीआरपीसी १४९ च्या नोटिसा दिल्या आहेत. (Breaking News ) मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांना नोटिसा दिल्या आहेत. तर, भापकर यांच्या निवासस्थानाबाहेर सकाळपासून पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
भापकर नजरकैदेत आहेत. पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव जमवणे, पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास मनाई आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. कोणत्याही प्रकारचे निवेदन देणार नाहीत. (Breaking News ) काळे झेंडे दाखविणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नोटीसीचा भंग होणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी, असे नोटिशीत म्हटले आहे.
गृहमंत्र्यांना सामाजिक कार्यर्त्यांची भीती का वाटते? कोणतेही सरकार असो मंत्री, नेते शहरात आले की आम्हाला नजरकैदेत ठेवले जाते. (Breaking News ) आतापर्यंत २५ वेळा मला नजरकैदेत ठेवले आहे. ही लोकशाही नसून पोलीस, सरकारची हुकूमशाही असल्याचे भापकर म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : ‘ढ’ आमदारांना भाजप देणार नारळ; गुणपत्रक तपासणीस प्रारंभ; मोठ्या बदलांची शक्यता