Breaking News, पुणे : पुणे ते दौंड दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या मार्गावर लोकल सेवा सुरु करण्याची मागणी दिवसांपासून केली जात आहे. (Breaking News) मात्र सध्या ध्या या मार्गावर डेमू धावते. यामुळे प्रवास होत असला तरी लोकल सेवा सुरु केल्यास याचा थेट फायदा या मार्गावर रोज प्रवास करणाऱ्या किमान पन्नास हजार प्रवाशांना होणार आहे. याचाच विचार करुन रेल्वे विभागाने या मार्गावर रेल्वे सेवा सुरु करण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला आहे. (Breaking News)
पुणे-दौंड दरम्यान लवकरच लोकलसेवा (ईएमयू अर्थात इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) सुरु होणार आहे. मुंबई विभागाचे पाच ईएमयू रेक पुणे विभागाला मिळणार असल्याने या लोकलचा प्रवास सुरु होत आहे. मात्र यासाठी आणखी सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. सत्या तुलनेत ईएमयू (लोकलचा) प्रवास चांगला होईल.
गेल्या अनेक वर्षांपासूनची दौंडवासी पुणे लोकलची मागणी करीत आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे लोकलची मागणी करण्यात आली आहे. साधारणतः उपनगराचा दर्जा असलेल्या विभागांतच लोकल धावते. दौंडला उपनगरचा दर्जा देणे ही बाब राज्य सरकारच्या अखत्यारीत येते. मात्र या तांत्रिक बाबीत अडकून न राहता रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सोयीसाठी लोकल सुरु करीत आहे.
पाच लोकल धावणार
पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलसाठी सिमेन्सचा रेक वापरला जातो. मात्र पुणे-दौंड दरम्यान बम्बार्डियरचा रेक वापरला जाण्याची शक्यता जास्त आहे. सिमेन्सच्या तुलनेत बम्बार्डियरचा रेक जास्त चांगला आहे. बम्बार्डियरचा वेग ताशी ११०, तर सिमेन्सचा वेग ताशी १०० किमी आहे. पुणे-दौंड दरम्यान लोकलचे पाच रेक धावतील.
मुंबई विभागात वातानुकूलित लोकलच्या संख्येत वाढ होईल तेव्हा ईएमयूचे पाच रेक पुण्याला मिळतील. रेक उपलब्ध झाल्यावरच पुणे-दौंड लोकलसेवा सुरु होईल. त्याआधी विभागाने आपल्या पातळीवर त्यादृष्टीने अंतर्गत कामे सुरु केली आहेत.
– डॉ. स्वप्नील नीला, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, पुणे
पुणे-दौंड लोकल सुरु होण्यासाठी ही चांगली घडामोड आहे. सेवा सुरु होईल तेव्हा रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना फायदा होईल. रेल्वे प्रशासनाने दौंड ते लोणावळा थेट लोकलने जोडण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे.
– मयुरेश झव्हेरी, सदस्य, पिंपरी चिंचवड प्रवासी संघ
डेमूचे तोटे
पुणे-दौंड डेमू डिझेलवर धावत असल्याने खर्च तुलनेने जास्त
केवळ आठ डबे असल्याने प्रवासीसंख्येवर मर्यादा, बसण्याच्या जागेवरून अनेकदा वाद
आसन क्षमता केवळ ९०, तर सुमारे २०० प्रवासी उभे राहू शकतात
लोकलच्या तुलनेत डब्यांची रुंदी कमी
प्रथमश्रेणीचा डबा नाही
वेग ताशी सरासरी ७० किमी
लोकलचे फायदे
लोकलसाठी विजेवर धावणारे ईएमयू रेकच वापरले जात असल्याने डिझेलची आवश्यकता नाही
१२ किंवा १६ डब्यांच्या लोकलमुळे जास्त प्रवाशांची वाहतूक
विक्रेते, महिला व प्रथमश्रेणी अशा विविध डब्यांमुळे गर्दी विभागली जाते
डेमूच्या तुलनेत डब्यांची रुंदी जास्त असल्याने प्रवासी जास्त संख्येने सामावण्याची क्षमता
एका डब्यात ११० आसन क्षमता, तसेच उभे राहून प्रवासी ३०० प्रवासी प्रवास करू शकतात
ताशी ११० किमी वेगामुळे जलद प्रवास, पर्यायाने प्रवाशांचा वेळ वाचतो