Breaking News : पुणे : शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना होऊन वर्ष होत आलं तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याची प्रतीक्षा सर्वांनाच होती. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्लीत गेले होते. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत भाजपचे नेते अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची तीन ते चार तास शाह यांच्याशी चर्चा झाली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.(Breaking News)
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना बळ आलं आहे. दिल्लीत त्यांनी भाजपचे नेते अमित शाह यांची भेट घेतली.(Breaking News) या वेळी कोणत्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करायचा? कोणाला कोणती खाती द्यायची? किती पालकमंत्री करायचे? फडणवीस यांच्याकडे कोणती खाती असतील? मित्र पक्षांचा समावेश आदी मुद्दयांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, सरकारमधील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या खात्रीलायक माहितीनुसार, येत्या रविवारी किंवा बुधवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यासाठी राजभवनावर छोटेखानी समारंभ आयोजित केला आहे. या समारंभामध्येच विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे.(Breaking News)
मंत्रिमंडळात ज्या मंत्र्यांना स्थान देण्यात येणार आहे, अशा संभाव्य मंत्र्यांना निरोप देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाचे नेते आणि भाजपच्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. महिलांचाही या मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.(Breaking News)
दरम्यान, सुमार कामगिरी असलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याच्या सूचना अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केल्या होत्या. त्यानुसार शिंदे सरकारमधील चार मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. हे चार मंत्री नेमके कोण असणार आहेत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.(Breaking News)
शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदे मिळणार आहेत. कॅबिनेट आणि राज्य मंत्रिपद देण्यात येणार आहे. तर शिंदे गटाकडून या दोन्ही मंत्रीपदासाठी ज्येष्ठ नेत्यालाच संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. केंद्र आणि राज्यपाल पातळीवरील मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.(Breaking News)