Breaking News : पुणे : प्रत्येकी ५ लाखांचे बक्षीस असलेल्या राजस्थानमधील २ अतिरेक्यांना पुणे पोलिसांनी मंगळवारी (ता.१८) अटक केली आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी दिली आहे.
इम्रान खान आणि मो. युनूस साकी (दोघेही, रा. रतलाम, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
एन.आय.ए. ने जाहीर केले होते ५ लाखाचे बक्षीस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल प्रदीप चव्हाण आणि अमोल नझन हे मंगळवारी (ता.१८) गस्त घालत होते. (Breaking News) यावेळी पोलिसांनी पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ३ संशयित दुचाकी चोरांना पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची घरझडती करण्यासाठी नेण्यात आले. त्यावेळी त्यांच्यातील एक जण पळून गेला. पोलिस पथकाने त्यांच्यापैकी दोघांना पकडले.
दोन्ही आरोपींच्या कोंढवा येथील घरामध्ये पोलिसांनी एक जिवंत काडतुस, ४ मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले. पोलिसांना सुरुवातीला ते वाहन चोर असल्याचा संशय होता. (Breaking News) पोलिसांनी त्यांच्याकडील लॅपटॉपची तपासणी केल्यावर ते देत असलेली माहिती आणि त्यातील कागदपत्रे यात विसंगती आढळून आली.
दरम्यान, हे दोघेही देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशय आल्याने शहर पोलिसांनी ही बाब दहशतवाद विरोधी पथकाला कळविली. दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळताच, पथक कोथरुड पोलिस ठाण्यात दाखल झाले. (Breaking News) त्यानंतर या दोघांना गुन्हे शाखेत आणण्यात आले. पोलिस आयुक्त रितेशकुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी त्या दोन्ही आरोपींची सखोल चौकशी केली.
याबाबत बोलताना पोलिस आयुक्त रितेशकुमार म्हणाले कि, हे दोन्ही संशयित आरोपींनी राजस्थानमधील चितोढगड या ठिकाणी गुन्हा केला होता. एनआयएने केलेल्या कारवाईत त्यांच्याकडे काही स्फोटके सापडली होती. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा एजन्सींनी त्यांना फरार घोषित केले आहे. (Breaking News) आणि त्यांना पकडणार्यास प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. राजस्थानमधून ते पुण्यात पळून आले असून गेल्या १५ ते १६ महिन्यांपासून ते पुण्यात राहत आहेत. तसेच त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे.