पुणे : टपाल कार्यालयाने डिजिटल क्षेत्रात पाऊल टाकले असून तापल आता नवनवीन योजना सुरु करत आहे. अशातच आता टपाल कार्यालयाने नागरिकांसाठी खास योजना आणली आहे. नागरिकांना आता घरबसल्या ‘स्पीड पोस्ट आणि पार्सल’ बुक करता येणार आहे. बुक करण्यात आलेल्या वस्तू पिकअप करण्यासाठी स्वतः पोस्टमन घरी येणार आहेत.
यासाठी नागरिकांना ऑनलाइन पेमेंट करावे लागणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांना टपाल कार्यालयात जाऊन रांगेत ताटकळत उभं राहण्याची गरज पडणार नाही. या सुविधेला ‘क्लिक अँड बुक’ या नावाने संबोधण्यात आलं आहे.
असा घेता येणार लाभ
स्पीड पोस्ट किंवा पार्सल पाठविण्यासाठी नागरिकांना टपाल विभागाच्या संकेतस्थळावर जावे लागणार आहे. या संकेतस्थळावर आपले नाव आणि इतर माहिती एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्ही कितीही वेळा या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
संकेतथळावर नावनोंदणी केल्यानंतर ५ किलोपर्यंतचे स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट अगर पार्सल बुकिंग करू शकतात. त्यासाठी ५०० रुपयांच्या आसपास पोस्टेज खर्च येणार असून, ५० रुपये पोस्ट खर्च वेगळा आकारण्यात येणार आहे. पोस्टेज ५०० रुपयांपेक्षा जास्त असेल, तर कोणताही चार्ज घेण्यात येणार नाही.
सध्या ‘या’ कार्यालयात सुविधा सुरू
पुणे सिटी पोस्ट (पिन कोड ४११००२)
पुणे हेड पोस्ट ऑफिस (जी पी ओ: पिन कोड ४११००१)
एस. पी. कॉलेज पोस्ट ऑफिस (पिन कोड ४११०३०)
शिवाजीनगर पोस्ट ऑफिस (पिन कोड भारतीय डाक ४११००५)