पुणे : लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येत्या 12 ऑक्टोबर रोजी संपूर्ण दिवसभर शिरुर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरुर-हवेली, भोसरी, हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघात दौरा करणार असून, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा दौरा यशस्वी करण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा (उत्तर) अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील यांनी केले आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिरुर लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा कार्यालयात शरद बुट्टे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शरद बुट्टे-पाटील यांनी हे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार योगेशअण्णा टिळेकर (हडपसर) ,जयश्री पलांडे ( आंबेगाव), अतुल देशमुख (खेड-आळंदी), विकास डोळस (भोसरी) यांच्यासह जिल्ह्याचे सरचिटणीस संजय रौंधळ, ताराचंद कराळे भगवान शेळके, सविता गावडे, महिला मोर्चा अध्यक्ष पूनम चौधरी, लोकसभा संयोजक, धर्मेंद्र खांडरे, प्रदेश प्रतिनिधी राम गावडे, विधानसभा संयोजक सचिन लांडगे (खेड), संदीप भोंडवे (शिरूर-हवेली), संजय थोरात (आंबेगाव), विजय फुगे (भोसरी), संदीप दळवी (हडपसर) तालुकाध्यक्ष संतोष खैरे (जुन्नर), संदीप बाणखेले (आंबेगाव), शांताराम भोसले (खेड), शाम गावडे (हवेली), प्रदीप उर्फ आबासाहेब सोनवणे (शिरूर), मारुती शेळके (शिरूर बेट) व जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष जनार्दन दांडगे यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद बुट्टे-पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुर लोकसभा जिंकण्याचा निर्धार केला आहे. यामुळे आगामी काळात लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत शिरूर लोकसभेत भाजपच्या विविध बड्या नेत्यांचे दौरे होणार असून, बड्या नेत्यांबरोबरच राज्याचे मंत्री देखील दौरा करणार आहेत.
संपूर्ण दिवस करणार दौरा
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या या दौऱ्यावेळी पूर्ण दिवसभर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरुर-हवेली, भोसरी, हडपसर या सहाही विधानसभा मतदारसंघात दौरा करणार असून, प्रत्येक विधानसभेतील प्रमुख 100 अशा 600 कार्यकर्त्यांशी ते थेट संवाद साधणार आहेत. विधानसभा मतदारसंघातील निवडक १०० कार्यकर्त्यांना प्रत्येकी ३ बूथची जबाबदारी दिली जाणार आहे.
प्रभारींची नेमणूक
यावेळी लोकसभा निवडणूक तयारीच्या कामाला गती मिळावी यासाठी शरद बुट्टे-पाटील यांनी विधानसभा मतदारसंघांसाठी राम गावडे (जुन्नर), शिवाजीराव भुजबळ (आंबेगाव), भगवान घोलप (खेड), जयसिंग एरंडे (शिरूर- हवेली), दादासाहेब सातव (भोसरी) यांना प्रभारी नेमण्यात आले असल्याची घोषणाही केली.