Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sasvad News : पुरंदर तालुक्यात सामाजिक कार्यकर्त्याचा तलवारीने सपासप वार करून खून ; सासवड पोलिसांनी ४ महिलेसह १२ जणांना ठोकल्या बेड्या..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 30 September 2023, 20:01

सासवड, (पुणे) : समाजकार्यातुन गावचा विकास करत असल्याचा राग मनात धरून १० ते १२ जणांनी तलवारीने मारहाण करून एकाचा खून केल्याची घटना गराडे रावडेवाडी (ता. पुरंदर) येथे घडली आहे. शुक्रवारी (ता. २९) रात्री सात वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी सासवड पोलिसांनी ४ महिलांसह १३ जणांवर गुन्हा दाखल केला असून १२ जणांना पोलिसांनी अटक केली असून आणखी एक आरोपी फरार आहे.

सचिन दिलीप रावडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विशाल गोकुळ रावडे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार महिलेसह १३ जणांवर गुन्हा दाखल करून १२ जणांना अटक केली आहे. तर यातील एकजण फरार आहे.

सागर भानुदास रावडे, शशिकांत भानुदास रावडे, दिपक सदाशिव रावडे, बाळासाहेब सदाशिव रावडे, अमर सखाराम रावडे, उमेश ज्ञानोबा रावडे, ज्ञानेश्वर वामन रावडे, सोमनाथ उर्फ बाबु हनुमंत रावडे, दत्तात्रय वामन रावडे, सुंदराबाई सखाराम रावडे, सारीका श्रीरंग रावडे, बेबी हनुमंत रावडे, पारूबाई भानुदास रावडे रा. सर्वजण गराडे, रावडेवाडी (ता. पुरंदर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील सोमनाथ उर्फ बाबु हनुमंत रावडे हा फरार असुन त्यांचा शोध घेण्यासाठी सासवड पोलिसांची दोन तपास पथके रवाना केली आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल रावडे यांची पत्नी सुप्रिया रावडे ही गराडे, रावडेवाडी ग्रामपंचायतीची अडीच वर्षापासून सदस्या आहे. यातील मयत सचिन रावडे व फिर्यादी हे दोघे गावामध्ये समाजकार्य करून विकास करत होते व याचाच मनात राग धरून यातील आरोपी हे मागील दिड वर्षापासून फिर्यादी विषाल रावडे व मयत सचिन रावडे यांचेशी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद काढुन जिवे मारण्याची धमकी देत होते.

शुक्रवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास गराडे रावडेवाडी येथे विशाल रावडे व इतर लोक हे त्यांचे मयत नातेवाईक गुलाब मारूती रावडे यांचा मृतदेह गावात येण्याची वाट पहात चौकात थांबले होते. यावेळी वरील आरोपी त्या ठिकाणी आले. यातील शशिकांत रावडे याने हातात तलवार व इतरांनी हातात चाकु, काठया, लोखंडी रॉड व महीलांच्या हातात मिरची पावडर होती. यावेळी महिलांनी हातातील मिरची पावडर विशाल रावडे यांच्या डोळ्यात टाकली.

यावेळी सचिन रावडे हा आडवा आला यावेळी शशिकांत रावडे याने ‘‘तुला विशालचा लय पुळका आला आहे का? त्याला का वाचवतोस, तुला आता जिवंत सोडत नाही’’ असे बोलुन शशिकांत रावडे व बाळासाहेब रावडे यांनी हातातील धारदार तलवारीने सचिन रावडे याच्यावर सपासप वार केले. तसेच त्याच्या साथीदारांनीहि ‘‘हाच विषालला वाचवतो आहे, याला संपवून टाका’’ असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी सागर रावडे, दिपक रावडे, बाळासाहेब रावडे यांनी त्यांचे हातातील चाकूने सचिनवर वार करीत असताना तानाजी रावडे, यश रावडे, ओंकार रावडे हे वाचविण्यासाठी मध्ये पडले असता त्यांचेवरही चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे.

आरोपी ज्ञानेश्वर रावडे, अमर रावडे यांनी त्यांचे हातातील काठीने व सोमनाथ रावडे, दत्तात्रय रावडे यांनी त्यांचे हातातील लोखंडी रॉडने व महीला सारीका रावडे, बेबी रावडे, पारूबाई रावडे, सुंदराबाई रावडे यांनी विशाल रावडे व सचिन रावडे यास हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून नवनाथ रावडे यांची चारचाकी इको गाडीची तोडफोड करून काचा फोडल्या. यावेळी जखमींना औषधउपचार कामी शासकिय रूग्णालय सासवड येथे आणले असता डॉक्टरांनी सचिन रावडे यास मयत घोषित केले.

सदरची कामगिरी सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव, राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, सहायक निरीक्षक विनोद महांगडे, बाजीराव ढेकळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे, पोलीस हवालदार रूपेश भगत, लियाकतअली मुजावर, गणेश पोटे, जब्बार सय्यद, किसन कानतोडे, निलेश जाधव, सुहास लाटणे, सुरज नांगरे, भगवान थोरवे, विक्रम भोर, रमेश कर्चे, प्रतिक धिवार, संजय दाने, वैभव मदने, हेमा भुजबळ, अश्विनी तावरे यांचे पथकाने केलेली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 12 ऑक्टोबरला येणार शिरुर लोकसभा मतदारसंघात...! शिरुरमधील सहाही विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार; शरद बुट्टे-पाटील यांची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.