आळंदी : Politics News – भाजप आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या दोन पक्षांचा चांगलाच संघर्ष बघायला मिळत नाही. निष्ठावंत म्हणत ठाकरे गटातून चक्क एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार सोबत घेत भाजप सोबत घरोबा केला. (Politics)पक्षाचे नाव आणि चिन्हही त्यांनाच मिळाले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापलेलेच आहे. (Politics)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी अखेर उद्धव ठाकरे यांना धक्का देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुन्हा भाजपने ठाकरे गटाला धक्का देत डिवचले आहे. येत्या ५ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गावडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
राम गावडे यांच्यासोबत त्यांचे समर्थक, गावोगावचे सरपंच-उपसरपंच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
गावडे आहेत तरी कोण ??
– धानेारे (ता. खेड) येथील शाखा प्रमुखपदापासून राम गावडे यांनी १९९१ पासून आपल्या राजकीय कारर्किदीस सुरुवात केली.
– पक्ष संघटनेतील बहुतेक सर्वच पदांवर काम करुन तब्बल सहा वर्षे पुणे शिवसेना जिल्हाप्रमुख.
गावडे काय म्हणाले…ठाकेरंनी अवमानाची दिली वागणूक..
राम सदाशिव गावडे हे येत्या ५ तारखेला भाजपत प्रवेश करणार आहेत. अशी माहिती गावडे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे राज्याच्या सर्वोच्च स्थानी बसूनही सामान्य शिवसैनिकांसह जिल्ह्यातील विकासासाठी काहीच दिले गेले नाही. सतत अवमानाची वागणूक आणि वारंवार बैठका-चर्चा करुनही अंमलबजावणीच होत नसल्याने खेड-आळंदी विधानसभा मतदार संघ तसेच शिरुर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण भाजपत प्रवेश करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव, तसेच माजी आमदार सुरेश गोरे यांचे कुटुंब शिंदे गटात दाखल झाले तरी देखील उद्धव ठाकरे यांनी आपली दखल घेतली नाही. त्यामुळे ठाकरे गटातील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त होत असल्याचे पत्र उध्दव ठाकरे यांना ३१ मार्च रोजी पाठविल्याची माहिती गावडे यांनी दिली आहे. राम गावडे यांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे आळंदी आणि पंचक्रोशीत भाजपला भविष्यात मोठी ताकद मिळणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
BJP News |बारामतीत भाजप राष्ट्रवादीला देणार आव्हान ; बाजार समितीची निवडणूक लढणार असल्याचे केले जाहीर
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना धक्का ! पुण्यातील माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश