दीपक खिलारे / इंदापूर : नागपूर येथे भाजपच्या सर्व प्रमुख प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या महत्वाच्या बैठकीस शनिवारी (दि.16) सकाळी प्रारंभ झाला. राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीमध्ये सन 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नियोजन व पक्ष संघटना बळकट करून पक्षाचा जनाधार आणखी वाढविणे संदर्भात निर्देश दिले जाण्याची शक्यता आहे.
कोराडी येथील नैवेद्यम नॉर्थ स्टार येथे ही बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे सहसंघटनमंत्री शिवप्रकाश तसेच राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजप आयटी सेलचे राष्ट्रीय संयोजक अमित मालवीय आदी अनेक प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत.
भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे बैठकीमध्ये सहभागी झाले असून, बैठक स्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदि वरिष्ठ नेत्यांशी हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी संवाद साधला.