पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्शे कारने दोघांना रस्त्यावर चिरडल्याची घटना घडल्यानंतर या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अल्पवयीन मुलाचे ससून रुग्णालयामधील घेण्यात आलेले रक्ताचे सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर घेण्यात आलेलं सॅम्पल कोणाचे अशी चर्चा सर्वत्र रंगली होती.
मात्र, आता हे रक्त त्या अल्पवयीन मुलाच्या आईनेच दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. अल्पवयीन मुलाच्या आईला अटक केल्यानंतर तिने चौकशीत कबुली दिली आहे. माझा मुलगाच गाडी चालवत होता, याचीही कबुली त्याच्या आई-वडिलांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्वात मोठा उलगडा झाला आहे.