पुणे : Pune Crime – मावळ तालुक्यातील शिरगाव गावचे विद्यमान सरपंच प्रवीण गोपाळे यांची भर चौकात काही जणांनी हल्ला करत हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे पुणे (Pune Crime) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Crime)
प्रवीण गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. काही दिवसापूर्वी शिरगाव ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक झाली होती, त्यामुळे ते प्रसिद्धी झोतात आले होते.
भर चौकात एका सरपंचाची हत्या झाली असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सरपंच प्रवीण गोपाळे यांची हत्या झाल्याने गावामध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी बडा बंदोबस्त ठेवला आहे. गोपाळे यांची हत्या कोणत्या कारणावरून झाली आहे हे अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिसांकडून तपास सुरू असून अज्ञात मारेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Shirur News : शिरूर तालुक्यात आनंदाचा शिदा वाटण्यास प्रारंभ
Politics News : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे एप्रिल फुल आंदोलन