Big News : पुणे : ट्विटरचे नियम न पाळल्याने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार गटाकडून ट्विटरचे एक नवीन अकाऊंट NCPspeaks_official तयार केले होते. अनेकांनी या अकाऊंटला ट्विटमधून टॅग केले होते. मात्र, हे अकाऊंट आता ट्विटरने सस्पेंड केल्याचे दिसत आहे. शरद पवार गटाचे ट्विटर अकाऊंट @NCPSpeaks ॲक्टिव असल्याचे दिसत आहे. शरद पवार गटाकडून या ट्विटर हँडलवर दावा केल्यानंतर दोन दिवसांपासून हे अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. (Big News) दरम्यान, अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर अजित पवार गटाने ट्विटरला मेल केला असून, आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लवकरच हे हँडल सक्रिय होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अधिकृत ट्विटर हॅंडल तसेच निवडणूक चिन्ह आणि पक्ष कुणाला मिळणार?
सभा आणि पत्रकार परिषदेतील मुद्दे, एखाद्या राजकीय दौऱ्याची माहिती, व्हिडीओ, फोटो तत्काळ पोहोचविण्यासाठी या माध्यमाचा वापर करण्यात येतो. (Big News) राष्ट्रवादीचे दोन्ही गट सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय आहेत. यामुळेच ट्विटर हे उत्तम माध्यम आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर दोन्ही गटांकडून पक्षावर दावा सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजित पवार गटाने थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यानंतर आता शरद पवार गटानेही निवडणूक आयोगाकडे आपले मत मांडले आहे. (Big News) पक्ष आणि चिन्हासााठी दोन्ही आघाडीत दावे प्रतिदावे सुरू आहेत. आता अधिकृत ट्विटर हॅंडल तसेच निवडणूक चिन्ह आणि पक्ष कुणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : मराठा समाजाला आरक्षण जरूर द्यावं , पण ओबीसीतून नको : ॲड. महेश भागवत