Big News : पुणे : पुण्यातील आंबिल ओढा वसाहत परिसरातील साने गुरुजी तरुण मंडळाने उभारलेल्या देखाव्याला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. २६) सायंकाळी घडली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती पुणे अग्निशमन दलाकडून देण्यात आली. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
नड्डा यांना आरती सोडून जावे लागले
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळाने गणेशोत्सवासाठी उज्जैनच्या महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. (Big News) या मंदिराच्या कळसाला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून दोन फायरगाड्या व एक वॉटर टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आला. अग्निशमन दल पाणी मारुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतानाच जोरदार पाऊस सुरु झाल्याने आग काही वेळातच विझली.
दरम्यान, आगीची घटना घडली त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मंडपात गणपतीच्या आरतीसाठी आले होते. (Big News) परंतु आग लागल्याचे समजताच नड्डा यांना आरती सोडून जावे लागले. कार्यकर्त्यांनी तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने लवकर आग विझल्याने मोठी दुर्घटना टळली.
या मंडळाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : मुलाने आई, बहिणीच्या पोटात खुपसला चाकू
Big News : शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लांबणीवर; पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला