पुणे : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाला आहे. रात्री अंधारात लाईट सुरु करायला जात असताना वळसे पाटील पाय घसरुन पडल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात वळसे पाटील यांचे हात, पाय आणि पाठीला दुखापत झाली आहे. औंध येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. वळसे पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सहकारमंत्री वळसे पाटील लाईट सुरु करायला जात असताना अंधारात त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. या अपघातात त्यांचे हात, पाय आणि पाठीला मोठी दिखापत झाली आहे. त्यांच्यावर १२ ते १५ दिवस रुग्णालयात उपचार सुरु रहातील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत वळसे पाटलांवर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्यावर आहे. शिरूरची जागा महायुतीसाठी महत्त्वाची आहे. अजित पवारांसाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. यातच त्यांना दुखापत झाल्यामुळे त्यांचे काही दिवस रूग्णालयातच रहावे लागणार आहे. वळसे पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.