उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन, (पुणे) : वडिलोपार्जित शेतजमिनीचा हिस्सा विकल्याच्या कारणावरून नातेवाईकांनी एका महिलेसह तिच्या पतीला व मुलाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना उरुळी कांचन (ता. हवेली) येथे घडली आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील सोनार आळी परिसरात शनिवारी (ता. १८) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी १० जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोपट बाबुराव बंड (वय – ५१), वैभव पोपट बंड (वय – २७), विदया पोपट बंड (वय – ५०, रा. सर्व कॅनोलचे शेजारी, शिंदवणे रोड, उरुळी कांचन ता. हवेली), मच्छिंद्र बाबुराव बंड (वय – ४४), गोरख बाबुराव बंड (वय – ४८), ओमकार काका बंड (वय – २१), अनिता काका बंड (वय – ४९), पुनम विठ्ठल बंड (वय – २९), अनिता बाळु बंड (वय ५०), अनिता गोरख बंड वय ४३, रा. सर्व सिंगापुर ता. पुरंदर) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत.
याप्रकरणी सविता तुषार जगताप (वय -३७, रा. सोनार आळी, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील १० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता जगताप या सोनार आळी परिसरात राहतात. शनिवारी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरी असताना अचानकपणे वरील १० जण एकदम घरामध्ये घुसले. यावेळी सविता जगताप यांना सिंगापुर (ता. पुरंदर जि पुणे) येथील वडोलोपार्जित शेतजमीन मधील आजीचा हिस्सा का विकला याचा जाब विचारू लागले.
यावेळी सविता जगताप यांचा मुलगा शिवांश व त्यांचे पती तुषार जगताप यांना सदर १० जण शिवीगाळ करून हाताने मारहाण करू लागले. तसेच अनिता बंड यांनी तुषार जगताप यांच्या हातातील मोबाईल घेवुन जमीनीवर फेकुन फोडुन नुकसान केले. तसेच सर्वांनी शिवीगाळ करून तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
दरम्यान, याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सविता जगताप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे करीत आहेत.