Big Breaking भोर : पुणे आणि कोकणाला जोडणारा वरंध घाट हा सर्व प्रकारच्या अवजड वाहनांसाठी शनिवारपासून (१ जुलै) ते ३० सप्टेंबरपर्यंत असा ३ महिने बंद करण्याचा निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या काळात फक्त लहान मोटारी व दुचाकी वाहनांना घाटातून प्रवेश देण्यात येईल. मात्र याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या बस व मोठे ट्रक, इतर सहाचाकी वाहनांना बसणार आहे.
कार व दुचाकी वाहतूक राहणार सुरू
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे घाटामध्ये अनेक ठिकाणी दरडी पडणे, माती वाहून येणे, रस्ता खचणे असे प्रकार झाले होते. गेल्या पावसाळ्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने कोट्यवधी रुपये खर्चून महाड व भोर तालुक्यांच्या हद्दीत रस्त्याची दुरुस्ती केली होती.(Big Breaking ) मात्र यंदाही हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी वरंध घाटामध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनाने हा घाट तीन महिने बंद ठेवण्याचा आदेश दिला.
दरम्यान, भोर बाजूनेही हा घाट अवजड वाहनांसाठी बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणार आहोत, अशी माहिती भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली. (Big Breaking ) याबाबत बोलताना महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. एस. आंधळे म्हणाले कि, कोकणातून पुण्याकडे जाण्यासाठी महाड, माणगाव, ताम्हिणी घाट, मुळशी, पुणे या मार्गाचा आणि कोल्हापूरकडे जाण्यासाठी पोलादपूर, खेड, चिपळूण, पाटण, कराड, कोल्हापूर या पर्यायी रस्त्याचा वापर करावा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking ! पुणे महापालिकेतील एकास १ लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले; एसीबीची कारवाई…