Big Breaking News : पुणे : माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता, त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बोरवणकर यांनी केलेल्या दाव्यामुळे अजित पवार यांच्यासमोरील अडचणी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
येरवडा येथील पोलिसांची जमीन बिल्डरला दिल्याचा आरोप
अजित पवार यांनी बंडखोरी करत, सत्ताधारी भाजप-शिवसेनेसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. नुकतेच त्यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. परंतु आता अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. पुणे पोलीस आयुक्तपदी मीरा बोरवणकर असतानाच्या २०१० मधील एका प्रकरणाचा उल्लेख बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात केला आहे. (Big Breaking News) हे पुस्तक रविवारपासून बाजारात येत आहे. येरवडा येथे पोलिसांची तीन एकर जमीन अजित पवार एका खासगी बिल्डरला दिल्याचा आरोप त्यांनी नाव न घेता केला आहे. जिल्ह्याचे मंत्री ‘दादा’ असे त्यात म्हटले आहे. या तीन एकर जागेवर पोलिसांचे कार्यालय होणार होते, असा दावा पुस्तकातून करण्यात आला आहे.
येरवडा येथील पोलिसांची सरकारी जागा खासगी व्यक्तीला दिली तर आपल्या प्रतिमेस धक्का बसेल, असे म्हणत आपण या व्यवहारला विरोध केला होता.(Big Breaking News) परंतु माझे ऐकले गेले नाही आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्ण करण्यात आला, असा आरोप मीरा बोरवणकर यांनी केला आहे. या पुस्तकाची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी या प्रकरणावरुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार भ्रष्टाचारात बुडाले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :