Big Breaking : पुणे : पुणे शहरातील वेंकटेश्वरा हॅचरीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आणि त्याची उपकंपनी व्हिओएलच्या एकूण नऊ मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केल्या आहेत. सुमारे ६५ कोटी ५३ लाख रुपयांच्या या मालमत्ता आहेत. या कंपनीच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील मालमत्ता सील केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
वेंकटेश्वरा हॅचरीजची मालमत्ता जप्त
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने २०११ पासून वेंकटेश्वरा हॅचरीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची (Big Breaking ) आणि युनायटेड किंगडम या त्याच्या उपकंपनीची चौकशी सुरु केली होती. या प्रकरणाच्या तपासातून मेसर्स व्हीएचपीएलने मेसर्स व्हीओएलच्या व्यवसायात गैरप्रकार आढळून आला. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.
मूळ कंपनीतून व्हीओएल कंपनीला इक्विटी इन्फ्युजनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी पाठवला गेला. परंतु कंपनीतून कोणत्याही प्रकारचे प्रॉडक्शन सुरु झाले नाही. यामुळे एकूण ६५ कोटी ५३ रुपयांचा व्यवहार यामध्ये झाला होता.(Big Breaking ) व्हीएचपीएल या कंपनीने पाठवलेल्या निधीतून युनायटेड किंगडमने “अलेक्झांडर हाऊस” नावाची स्थावर मालमत्ता खरेदी केली. व्हिएचपीएल कंपनीने पाठवलेला पैसा व्हिओएल कंपनीने युकेमधील मिळालेले कर्ज फेडण्यासाठी केला.
पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेसंदर्भात ईडीने मोठी कारवाई केली होती. या बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे छापेमारी केली होती. (Big Breaking ) मूलचंदानी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केले होते. सुमारे ४५० कोटींचा हा घोटाळा होता. या प्रकरणी मूलचंदानी आणि इतर काही जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.