Big Breaking : मुंबई : मोठी बातमी समोर येत आहे. भाजपाचे आमदार राहुल कुल अध्यक्ष असलेल्या दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित निःपक्ष चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे. आमदार राहुल कुल यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले आहे.
तारांकित प्रश्नाला सरकारचे उत्तर; भ्रष्टाचार झालाच नाही!
पुणे जिल्ह्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारख्यान्यातील भ्रष्टाचाराबाबत राहुल कुल यांना राज्य सरकारने क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. (Big Breaking) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित गंभीर आरोप केले होते. राहुल कुल यांनी दौंडमधील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात तब्बल ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. कुल यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे त्यांनी म्हटले होते. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली होती.
मात्र, राहुल कुल यांना क्लीन चिट मिळाल्याने हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. साखर कारख्यानात कोणताही घोटाळा झालेला नाही. २०२२-२३ चा लेखा परीक्षण अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र, २०२१-२२ च्या लेखा परीक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे उत्तर राज्य सरकारकडून विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्नाला देण्यात आले आहे. (Big Breaking) तर इतर आर्थिक वर्षांच्या अहवालांची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून, अहवालात जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking News : पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळली, दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर परिणाम