Big Breaking : पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे माळेगाव सारख कारखान्याच्या मोळी पुजेसाठी बारामतीत जाणार होते. मात्र सकल मराठा समाजाच्यावतीने पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आल्याने त्यांच्या दौऱ्यासाठी देखील मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. शिवाय आंदोलनाचा इशारादेखील दिला होता. मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे अजित पवारांना बारामती दौरा रद्द केला आहे.
मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे दौरा रद्द
राज्यभरात राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी तसेच राजकीय कार्यक्रमांना मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध केला जात आहे. बारामती मध्ये देखील अजित पवारांच्या या दौऱ्याला विरोध केला जात होता. काल तसं लेखी निवेदन स्थानिक पोलीस आणि कारखान्याच्या प्रशासनाला देण्यात आलं होते. (Big Breaking) काल दिवसभर चर्चा झाल्यानंत देखील तोडगा निघू शकला नव्हता. अखेर अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्याच्या या कर्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संभाव्य संघर्ष टळला आहे. यावेळी पोलिसांनी कारखान्याच्या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच सकाळ पासूनच मराठा आंदोलक देखील या कार्यक्रमस्थळी जमा होत होते.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा काही दिवसांपासून पेटला आहे.(Big Breaking) मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी यासाठी अमरण उपोषण सुरू केलं आहे. यादरम्यान राज्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
दरम्यान, बारामती शहर आणि तालुक्यात कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना फिरू देणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आली. (Big Breaking) त्यातून सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांनी या कार्यक्रमाला जाणे टाळले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking : पुण्यात पीएमपीएल चालकाने १० ते १५ वाहनांना दिली जोरदार धडक